महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार ते धननंजय मुंडे यांच्यासह दिग्गजांच्या भविष्याचा आज मतदार करणार फैसला
देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि धननंजय मुंडे (Photo Credits-Twitter)

Maharashtra Assembly Elections 2019: महाराष्ट्रात विधानसभा निवडणूकीसाठी आज (21 ऑक्टोबर) मतदानाला सुरुवात झाली आहे. तर महाराष्ट्रात 288 जागांवर मतदान पार पडणार असून राजकरणातील दिग्गज कलाकांराच्या भविष्याचा फैसला आज मतदार करणार आहेत. महाराष्ट्रात भाजप (BJP)-शिवसेना (Shiv Sena) महायुतीचा मुकाबला थेट काँग्रेसCongress)-राष्ट्रवादी (NCP) आघाडीसोबत होणार आहे. तर या विधानसभा निवडणूकीचा निकाल येत्या 24 ऑक्टोबरला जाहीर केला जाणार आहे.

निवडणूकीच्या रिंगणात काही जण असे आहेत ज्यांचे परिवार एक आहे पण विचारांमध्ये मतभेद आहेत. तर यामध्ये सर्वात हायप्रोफाइल असलेले मुंडे परिवार यांच्या सदस्यांचे उदाहरण महाराष्ट्रात आहे. या परिवारातील दोन सदस्य म्हणजे भाजप उमेदवार पंकजा मुंडे विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार धननंजय मुंडे यांच्यातील सामना हा मराठवाड्याच्या राजकारणातील एक महत्त्वपूर्ण लढत आहे. दोघेही बीड जिल्ह्यातील परळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढत आहेत. दोघेही भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुडे यांच्या राजकीय मार्गदर्शनाखाली वाढले आहेत. तसेच अजित पवार हे राष्ट्रवादीकडून बारामती विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.

>>नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभेच्या जागेवरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात काँग्रेसने आशीष देखमुख यांना रिंगणात उतरवले आहेत.

>>वरळी विधानसभा मतदारसंघातून प्रथमच शिवसेना युवासेना प्रमुख आणि उमेदवार आदित्य ठाकरे निवडणूक लढवणार आहेत. ठाकरे परिवाराचा प्रथम सदस्य निवडणूकीच्या रिंगणात उतरला आहे.

>>कोथरुड मतदारसंघातून भाजपकडून चंद्रकांत पाटील यांना तिकिट देण्यात आले आहे. महाराष्ट्रात भाजपने पक्षाचे अध्यक्षपद चंद्रकांत पाटील यांच्याकडे सोपवले आहे. पाटिल हे महाराष्ट्रातील मराठ्यांच्या प्रमुख चेहऱ्यांपैकी एक आहेत.

>>एकनाथ शिंदे यांना ठाण्यातील कोपरी-पाचपाखाडी येथून उमेदवारी देण्यात आली आहे. एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात स्थानिकांची नेहमीच कामे करताना दिसून येतात. तसेच महाराष्ट्र सरकारमध्ये शिंदे यांच्याकडे कॅबिनेटमंत्री पद आहे. तसेच ठाण्यातील कोपरी-पाचपाखाडी येथील आमदार सुद्धा आहेत.

>>भोकर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे अशोक चव्हाण निवडणूकीच्या रिंगणात उतरले आहेत. अशोक चव्हाण हे प्रभावशाली कुटुंबातून वारसदारी मिळालेले नेते आहेत. महाराष्ट्राती दिग्गज राजकरणीयांच्या मधील एकच अशोक चव्हाण आहेत.

>>नबाब मलिक यांना राष्ट्रवादी पक्षाकडून तिकिट देण्यात आले आहे. अणुशक्ती नगर येथून मलिक यांना उमेदवारी देण्यात आली असून मुंबईत आरे कॉलनीतील वृक्षतोडीवरुन त्यांनी शिवसेना-भाजपवर जोरदार टीका केली होती.

>>नितेश राणे यांचा कणकवली विधानसभा मतदारसंघातून भाजपने रिंगणात उतरवले आहे. नितेश राणे हे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे सुपुत्र आहेत. 2014 मध्ये नितेश राणे यांनी कणकवली येथूनच काँग्रेस पक्षातून विजय मिळवत भाजपच्या एमएलए प्रमोद जाठर यांना पराभूत केले होते.

>>वरिस पठाण यांना एआयएमआयएम पक्षाने भायखळा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. वरिस पठाणे यांना टक्कर देण्यासाठी बिग बॉस मधील कलाकार एजाज खान अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उतरले आहेत.(महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 Live Updates: राज्यात 95 हजारहून अधिक केंद्रांवर मतदानाला सुरुवात, पहिल्या तासात 6 टक्के मतदान)

महाराष्ट्रात मतदानाला सुरुवात झाली असून राजकरणातील दिग्गज नेतेमंडळी आज मतदान करताना दिसून येणार आहेत. खासकरुन ठाकरे परिवार, नितीन गडकरी, सुप्रिया सुळे, गिरीश महाजन, प्रफुल्ल पटेल यांच्यासह अन्य मंडळी निवडणूकीसाठी सज्ज झाले आहेत. त्यामुळे आता महाराष्ट्रीत बड्या नेत्यांने भाग्य आज ईव्हीएम पेटीत बंद होणार असून कोणाची सत्ता स्थापन होणार हे पहाणे महत्वाचे ठरणार आहे.