Asaduddin Owaisi (Photo Credits-Facebook)

ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुलचे (AIMIM) प्रमुख असदुद्दीन औवेसी (Asaduddin Owaisi) हे महाराष्ट्रात पार पडणाऱ्या विधानसभा निवडणूकीच्या प्रचारदौऱ्यासाठी नांदेड (Nanded) येथे बुधवारी आले होते. त्यावेळी जनसभेला संबोधित करताना काँग्रेस, भाजप आणि शिवसेना यांच्यावर जहरी टीका औवेसी यांनी केली. तसेच अयोध्या प्रकरणी सुद्धा मुद्दा उपस्थित करत सुप्रीम कोर्टात झालेल्या सुनावणीबाबत ही मत मांडले. यावर औवेसी यांनी असे म्हटले की, मला निर्णय आधीच माहिती होता काय येणार आहे. परंतु अंतिम निर्णय असा असावी की ज्यामुळे कायद्याचे हात मजबूत होतील. तसेच बाबरी मशीद पाडले त्यावेळी काँग्रेसची सत्ता असून त्यावेळी नरसिम्हा राव हे पंतप्रधान होते. निवणडणूकीसाठी एआयएमआयएमवर मत कापल्याचा आरोप लगावण्यात आाल आहे. मात्र औवेसी यांनी त्यांच्या पक्षावर लावलेला आरोप फेटाळून लावला आहे.

तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर ही निशाणा साधत त्यांना हिरव्या रंगावरुन सुनावले आहे. 'उद्धव ठाकरे मला हिरव्या रंगाचा साप म्हणून संबोधतात. मात्र माझी आई मी खरच सु्ंदर असल्याचे म्हणते. खरतर शिवसेनेला हिरव्या रंगापासून दिग्गत आहे पण त्यांना माहिती असावे की, भारताच्या झेंड्यामध्ये ही हिरवा रंग आहे.' एवढेच नाही भाजपवरही औवेसी यांनी सभेदरम्यान टीका करत म्हटले की, देशातील 2 करोड लोकांना नोकरी आणि नोटाबंदी बाबत एकही शब्द भाजप काढत नाही. मात्र तुम्ही लोकांना नोकऱ्या कधी देणार असा सवाल केला असता भाजप पाकिस्तानबाबत गोष्टी सांगण्यास सुरुवात करतो.(मोहन भागवत यांच्यावर टीका करत असदुद्दीन औवेसी यांनी म्हटले- भारत हा कधीच हिंदू राष्ट्र नव्हता, आहे आणि होणार ही नाही)

तर गेल्या काही दिवसांपूर्वी औवेसी यांनी भागवत यांच्यावर टीका केल्यानंतर अजून एक ट्वीट करत असे म्हटले आहे की, भागवत हे विदेशातील मुस्लिम लोकांसोबत आम्हाला जोडण्याचा प्रयत्न करतात. पण यामुळे आमची भारतीयता कुठे ही कमी होत नाही. त्याचसोबत पुढे औवेसी यांनी असे ही म्हटले, हिंदू राष्ट्र = हिंदू सर्वोच्चता. हे आमच्यासाठी अस्विकार्य असल्याचे विधान केले होते.