महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल 2019: राष्ट्रवादीच्या समाधानकारक यशाचे दोन फायदे, जाणून घ्या
File Image of NCP chief Sharad Pawar | (Photo Credits: PTI)

महाराष्ट्र (Maharashtra) विधानसभा निवडणुकीच्या सध्याच्या निकालानुसार भाजप(BJP)-शिवसेनेच्या (Shivsena) महायुतीने सत्तेत पुन्हा पुनरागमन केले आहे. महाराष्ट्रात भाजपला 100, शिवसेना 57, तर राष्ट्रवादी पक्षाला 55 जागांवर आघाडी मिळाली आहे. मे महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला मोठा विजय मिळाल्यानंतर पक्षाच्या पहिल्या विधानसभा निवडणुकीत मिळालेला विजय या क्षणी अस्पष्ट दिसत आहे. आतापर्यंत उपलब्ध असलेल्या ट्रेंड आणि निकालांनुसार भाजपाने तीन जागा जिंकल्या आहेत आणि 98 जागांवर आघाडी घेतली आहे. त्यांचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेने तीन जागा जिंकल्या आहेत आणि 57 जागांवर आघाडी घेत आहेत. विरोधी पक्षांच्या छावणीतून बाहेर पडलेल्यांना सत्ताधारी म्हणून सामील होण्यासाठी लोकांनी स्वीकारले नाही. साताराचे राष्ट्रवादीचे माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी निवडणुकीआधी राष्ट्रवादी सोडून भाजप पक्षात प्रवेश केला. (महाराष्ट्रात मताचा कौल युतीला पण तरीही सत्ता स्थापनासाठी हे 3 पर्याय)

भाजप-सेनेच्या नेते अमित शाह, पंतप्रधान नरेंद्र मोदी, सेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या तडफदार प्रचारानंतरही राष्ट्रवादीची मते विचलित न झाल्याचा मोठा फायदा शरद पवार (Sharad Pawar) आणि त्यांच्या पक्षाला झाला. सध्याचा या निकालानुसार राष्ट्रवादीला (NCP) काँग्रेस (Congress) पेक्षा अधिक मतं मिळाली आहे. त्यामुळे, विधानसभेत त्यांना काही फायदे होतील.

1. विधानसभेत विरोधी पक्षनेते पद मिळणार

राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाने यंदा एकत्र येऊन निवडणूक लढवण्याचं निर्णय घेतला होता. आणि याचा पूर्ण फायदा राष्ट्रवादीला झाला. महाराष्ट्रात यंदा काँग्रेसच्या साथीने लढूनही राष्ट्रवादीने चांगले प्रदर्शन केले. राष्ट्रवादी 53, तर काँग्रेस 45 जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळे, महाराष्ट्र विधानसभेत राष्ट्रवादी विरोधी पक्ष नेत्याचं पद मिळणार मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. इतकेच नाही तर, राष्ट्रवादीने मावळ, बारामतीसह चुरशीची लढत झालेली परळी विधानसभा जागादेखील राष्ट्रवादीने जिंकून त्यांचे बळ सिद्ध केले.

2. शरद पवारांची राज्यसभा टर्म मार्चमध्ये संपतेय.. त्यांना पुन्हा सन्मानानं राज्यसभेवर पाठवता येणार

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा विधानसभेचा टर्म मार्च 2020. पण, आता विधानसभेत राष्ट्रवादीची आकडेवारी वाढली असल्याने पवारांच्या पुनः निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे, पुढील वर्षी त्यांचे विधानसभेत पुन्हा निवडून येण्याची शक्यता आहे.

यंदाच्या विधानसभा निवडणुकीतिल विशेष आकर्षण ठरले 35 उमेदवार ज्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी सोडून भाजप-शिवसेना पक्षात प्रवेश केला होता. या सर्व उमेदवारांना विधानसभेची उमेदवारी देण्यात आली होती आणि या 35 उमेदवारांपैकी 19 उमेदवारांचा पराभव झाला आहे.