प्रशांत किशोर यांचा आदित्य ठाकरे यांना मदतीचा हात, विधानसभेसाठी आखणार शिवसेनेचं धोरण
Prashant Kishor - Aaditya Thackeray (Photo Credits: Facebook/PTI)

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Polls) पार्श्वभूमीवर, जनता दल युनाईटेड (Janta Dal United) चे उपाध्यक्ष प्रशांत किशोर (Prashant Kishor) हे युवासेना (Yuvasena)  अध्यक्ष आदित्य ठाकरे (Aaditya Thackrey) याच्या मदतीला धावून आल्याचे समजत आहे, सूत्रांच्या माहितीनुसार, विधानसभेत शिवसेनेचा विस्तार वाढवण्यासाठी प्रशांत यंदा निवडणूक धोरण आखण्यात मदत करणार आहेत. सध्या आदित्य ठाकरे याच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात जन आशीर्वाद यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे, ज्यांतर्गत सुमारे 4000 किमी अंतर व्यापून आदित्य सामान्य नागरिकांची भेट घेत आहेत, या यात्रेला जोरदार प्रतिसाद मिळत असल्याने विरोधकांसोबतच भाजपला सुद्धा चिंता वाटत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे.

TOI च्या वृत्तानुसार किशोर यांच्या I-PAC म्हणजेच इंडियन पॉलिटिकल ऍक्शन कमिटीतर्फे शिवसेनेला मदत करण्यासंदर्भात अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. किशोर यांची संघटना ही महिला, तरुण आणि ज्येष्ठ नागरिकांचे काम करण्यासाठी प्रसिद्ध आहे, त्यामुळे याच पातळीवर काम करणाऱ्या सेनेला पाठिंबा देत आपल्या कामाचा विस्तार वाढवणे हा या मदतीमागचा असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. विधानसभा निवडणुकीत शिवसेना भाजप युती कायम राहणार, जागांबद्दल वाद नको: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

फेब्रुवारी मध्ये सुद्धा प्रशांत किशोर यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती, त्यावेळी यामागे कोणताही राजकीय हेतू नसल्याचे शिवसेनेकडून सांगण्यात आले होते, मात्र एका नेत्याने दिलेल्या विधानानुसार, त्यावेळेस किशोर यांनी आदित्यला राज्यव्यापी यात्रा करण्याचे सुचवले होते, जयनुसार आता या जन आशीर्वाद यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. सेनेकडून या यात्रेचा मूळ हेतू हा नागरिकांचे आभार मानणे असा सांगितलं असला तरी यामागे आदित्यला राज्याच्या मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून पुढे आणण्यासाठी मदत होऊ शकेल. राजू शेट्टी यांचं महाआघाडीबद्दल मोठं विधान; राज ठाकरे, प्रकाश आंबेडकर यांचा समावेश असेल तरच महा आघाडीमध्ये येणार

दरम्यान, किशोर यांची I-PAC संघटना तृणमूल काँग्रेस पक्षाला सुद्धा 2021 च्या विधानसभा निवडणुकीसाठी अशाच प्रकारची मदत करत आहे. 2014 मधील नरेंद्र मोदी यांच्या यशस्वी निवडणूक धोरणासाठी किशोर यांचे नाव प्रकर्षाने पुढे आले होते, एका वर्षानंतर किशोर यांनी महागठबंधन साठी सुद्धा धोरण आखले होते.