Achar Sanhita in Maharashtra 2024: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक (Maharashtra Assembly Election 2024) अखेर जाहीर झाली असून आचारसंहिता लागू (Assembly Election Code of Conduct) झाली आहे. केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी आज (15 ऑक्टोबर) घेतलेल्या पत्रकार परिषदेत घोषणा करण्यात आली. महाराष्ट्र राज्यासोबतच झारखंड विधानसभा निवडणूक (Jharkhand Election 2024 Dates) प्रक्रियाही (Maharashtra Election 2024 Date) या वेळी जाहीर करण्यात आली. महाराष्ट्रात ही निवडणूक (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) एकाच टप्प्यांमध्ये पार पडणार आहे. 20 नोव्हेंरब रोजी मतदान पार पडणार आहे तर लगेच 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी पार पडले. ज्यामुळे या निवडणुकीचा निकालही जाहीर होईल. हरियाणा आणि जम्मू-कश्मीर या राज्यांची निवडणूक पार पडल्यानंतर महाराष्ट्र आणि झारंखंड या राज्यांसाठी निवडणूक प्रक्रिया केव्हा सुरु होते, याबाबत प्रचंड उत्सुकता होती. जी आता संपली आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक कार्यक्रम
अचारसंहिता लागू: 15 ऑक्टोबर पासून
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख: 29 ऑक्टोबर
उमेदवारी अर्जांची छाननी: 30 ऑक्टोबर
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख: 4 नोव्हेंबर
मतदानाचा दिवस: 20 नोव्हेंबर
मतमोजणी दिवस: 23 नोव्हेंबर
महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणूक 2024 एकूण 288 जागांसाठी पार पडत आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार ही निवडणूक मतदान यंत्र म्हणजेच इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन (Electronic Voting Machine) अर्थातच ईव्हीएम (EVM) द्वारे पार पडणार आहे. निवडणूक पूर्णपणे पारदर्शी आणि कायदा व सुव्यवस्थेचे पालन करुन पार पडेल यावर निवडणूक आयोगाचा भर असणार आहे. (हेही वाचा, Maharashtra Vidhan Sabha Election Date: महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक 20 नोव्हेंबरला; निकाल 23 नोव्हेंबरला)
महाराष्ट्रातील एकूण मतदान केंद्रांची संख्या: 1लाख 183
शहरी मतदान केंद्र संख्या-
ग्रामीण मतदान केंद्र: 57,582
पुरुष मतदारांची संख्या:
महिला मतदारांची संख्या: 4.66 कोटी
महाराष्ट्रात एकूण मतदारसंख्या: 9 कोटी 63 लाख
नवमतदारांची संख्या: 20.93 लाख
दरम्यान, केंद्रीय निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीसोबत लोकसभेची पोटनिवडणुकही लागू होईल, असे सांगितले. महाराष्ट्रात नांदेड लोकसभा निवडणुकीसाठीही विधानसभेसोबतच मतदान पार पडेल, असे आयोगाने सांगितले. (हेही वाचा, Maha Vikas Aghadi Seat Allotment: महाविकासआघाडीची बाजी? जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला? संजय राऊत यांचे महत्त्वाचे वक्तव्य)
निवडणुकीची अचानक घोषणा, विरोधकांची टीका
केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणूक प्रक्रिया जाहीर करताच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जोरदार टीकास्त्र सोडले. निवडणूक आयोगाने राज्य सरकारा मोठ्या प्रमाणावर वेळ दिला. त्या वेळेत राज्य सरकारने राज्याची तिजोरी शक्य तितकी खाली केली. आता देण्यासारखे काहीच उरले नाही, तेव्हा निवडणूक जाहीर झाली, असेही जयंत पाटील यांनी म्हटले. दरम्यान, काहीही झाले तरी निवडणुकीत चित्र बदललेले पाहायला मिळेल, राज्यात महाविकासआघाडीचेच सरकार सत्तेत येईल, असा दावा जयंत पाटील यांनी या वेळी केला.