Maharashtra Assembly Election 2019: विधानसभेसाठी मनसेची 27 उमेदवारांची पहिली यादी जाहीर; नाशिक, पुणे, मुंबईवर फोकस
Raj Thackeray (Photo Credits: PTI/File)

येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी (Assembly Election 2019) मनसेने (MNS) आपली पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये एकूण 27 उमेदवारांचा समावेश आहे. मुंबई, पुणे, नाशिक अशा शहरी भागांवर मनसेने फोकस केलेला दिसत आहे. मात्र मुंबईमधील वरळी भागातील उमेदवारी अजून जाहीर करण्यात आलेली नाही. काल आदित्य ठाकरे यांनी आपण वरळी येथून निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले होते. त्यामुळे इथून आपली उमेदवारी न देता काका पुतण्याला मदत करेल अशी शक्यता वर्तवली जात आहे.

मनसे ट्विट -

मनसे विधानसभा निवडणुका लढवणार का? याबाबत संभ्रम होता. मात्र सोमवारी मनसेचा मेळावा पार पडला, यामध्ये आपण निवडणूक लढवणार असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले होते. तसेच 5 ऑक्टोबरपासून प्रचाराला सुरुवात होणार असल्याचीही माहिती दिली होती. या पार्श्वभूमीवर मनसेने पहिल्या यादीमार्फत  27 उमेदवारांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. या यादीमधील काही महत्वाच्या उमेदवारांमध्ये हडपसर येथून वसंत मोरे, माहीम येथून संदीप देशपांडे, सिंदखेडा येथून नरेंद्र पाटील, नाशिक पूर्व येथून अशोक मुर्तडक तर ठाणे येथून अविनाश जाधव यांचा समावेश आहे.

(हेही वाचा: Maharashtra Assembly Election 2019: महाराष्ट्र नवनिर्माण सेना निवडणुकीच्या रिंगणात; राज ठाकरे यांची 5 ऑक्टोबरला पहिली प्रचारसभा)

मुंबई येथे पार पडलेल्या मनसेच्या मेळाव्यात राजसाहेब ठाकरे यांनी पक्षाचे नेते, सरचिटणीस, सचिव, उपाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष व विधानसभा 2019 निवडणूकीच्या पक्षाच्या संभाव्य उमेदवारांना मार्गदर्शन केले. यावरून मनसे मोठ्या ताकदीनिशी विधानसभा निवडणुकीत उतरण्याची चिन्हे दिसत आहेत. दरम्यान उद्योगपती सुमेध भवर यांना भाजपकडून उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी आज मनसेमध्ये प्रवेश केला आहे.