महाराष्ट्र नवनिर्माण सेना (Maharashtra Navnirman Sena) महाराष्ट्र विधानसभा निवडणूक (Maharashtra Assembly Election 2019) लढवणार आहेत. येत्या 5 ऑक्टोंबरला मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पहिली प्रचारसभा घेणार असल्याची माहीती दिली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना विधानसभा लढवणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. परंतु, सोमवारी वांद्रे येथे मनसे कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. या दरम्यान राज ठाकरे यांनी अगामी विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली होती. येत्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर धर्मा पाटील यांचे सुपुत्र नरेंद्र पाटील आणि नाशिक येथील शिवसेना पक्षाचे नगरसेवक दिलीप दातीर यांनी मनसेचा झेंडा हाती घेतला आहे. त्याचबरोबर 5 तारखेच्या प्रचारसभा दरम्यान महाराष्टातील जनतेला मला बरेच काही सांगायचे आहे, असे विधान राज ठाकरे यांनी केले आहे.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अनेक नेत्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून लढण्याची तयारी दाखवली आहे. तसेच नरेंद्र धर्मा पाटील आणि नाशिक येथील शिवसेना पक्षातील नगरसेवक दिलीप दातीर यांनी मनसेमध्ये प्रवेश केला आहे. हे दोघेही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे राज ठाकरे यांनी जाहीर केले आहेत. तसेच रोज 4 ते 5 उमेदवारांची नावे जाहीर करेल, असेही राज ठाकरे म्हणाले आहेत. महत्वाचे म्हणजे, 5 ऑक्टोंबर रोजी राज ठाकरे पहिली प्रचारसभा घेणार आहेत. '5 तारखेच्या प्रचारसभे दरम्यान मला बरेच काही सांगायचे आहे. ऐवढ्या दिवस जे काही बोललो नाही ते पहिल्या प्रचारसभेत महाराष्ट्रातील जनतेला मी सांगेन', असे राज ठाकरे यांनी सांगितले. विधानसभा निवडणुकीच्या जागांबाबत योग्यवेळी घोषणा करेल, राज ठाकरे म्हणाले आहेत. हे देखील वाचा-'मनसे'चा मुंबई येथे भव्य मेळावा; विधानसभा निवडणूक उमेदवारांबाबत मोठी घोषणा होण्याची शक्यता
MNS अधिकृत ट्वीट-
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मनसे अध्यक्ष श्री. राजसाहेब ठाकरे 'महाराष्ट्र विधानसभा २०१९' निवडणुकीच्या प्रचाराची पहिली सभा ५ ऑक्टोबर २०१९ रोजी घेणार.#मनसेदणका #रेल्वेइंजिन pic.twitter.com/NQLQBVfvDn
— MNS Adhikrut (@mnsadhikrut) September 30, 2019
मागील विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या हाती अपयश आले होते. तसेच मागील लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी 'लाव रे तो व्हिडिओ' अशी मोहीम हाती घेऊन भाजपच्या नाकी नऊ आणले होते. महाराष्ट्रातील जनतेनेही हा मोहिमेला मोठी पसंती दाखवली होती. परंतु राज ठाकरे यांचे हे प्रयत्न निष्फळ ठरले होते. या निवडणुकीत राज ठाकरे कोणता मुद्दा मांडणार आहेत? याकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे.