Maharashtra: ठाणे येथे पेट्रोलपंपावर चोरी करण्याप्रकरणी पाच जणांना अटक
Arrest । Image Used For Representational Purpose (Photo Credits: Facebook)

ठाणे येथील पेट्रोल पंपावर चोरीच्या घटनेचा पोलिसांनी अखेर पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी पोलिसांकडून तेथीच कर्मचाऱ्यासह पाच आरोपींना अटक केली आहे. अज्ञात व्यक्तीने पेट्रोल पंपावरुन 27.5 लाखांची रोकड कापूरबावडी येथून गर्दीच्या वेळेस लंपास केली. ही घटना 31 जानेवारीची आहे.(Satara Crime: तरुणाला बेदम मारहाण करुन उकळत्या चुन्यात ढकलले, सातारा शहरातील घटना)

तपासादरम्यान, सातारा येथे राहणाऱ्या एक आरोपी विनोद कदम याच्या पुजेच्या खोलीत पैसे पुरल्याचे समोर आल्याचे पोलीस डॉ. विनयकुमार राठोड यांनी म्हटले. शिल्लक राहिलेली रक्कम त्याने खर्च केल्याचे पोलिसांना सांगितले. या प्रकरणी जवळजवळ 35 सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासून पाहिले.

पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या माजी कर्मचाऱ्याने आरोपींना चोरी करण्यासाठी मदत केल्याचे सांगितले. त्याने ज्या ठिकाणी पैसे ठेवले जातात त्याची चावी सुद्धा दिल्याचे डीसीपी यांनी म्हटले.(Jalgaon: तरुणीचा दबाव, तरुणाची आत्महत्या, लग्नासाठी तगादा लावल्याने टोकाचे पाऊल)

पोलिसांकडून नयन पवार, माजी कर्मचारी याला अटक केली आहे. त्याच्या अटकेनंतर सुधाकर मोहिते, विनोद कदम आणि भास्कर सावंत आणि पाचवा आरोपी रितेश मांडवकर याला अटक केली आहे. मांडवकर हा ज्यावेळी गुन्हा घडत होता तेव्हा तो तेथे काम करत होता. त्यानेच त्याच्या साथीदारांना सुद्धा मदत केली असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.