Yavatmal: यवतमाळ येथे नणंदेने स्वत:च्या वहिनीला जिवंत जाळले, कारण ऐकून पोलिसांनाही बसला धक्का
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: PTI)

मुलगी झाली म्हणून एका महिलेला जिवंत पेटवून दिल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेत पीडित महिलेचा उपाचारादरम्यान मृत्यू झाला आहे. ही घटना यवतमाळ (Yavatmal) जिल्ह्याच्या पांढरकवडा (Pandharkawada) तालुक्यातील दातपडी (Datpadi) परिसरात घडली आहे. याप्रकरणी पीडित महिलेच्या नणंदेला अटक करण्यात आली आहे. पीडित महिलेने मुलीला जन्म दिल्याने आता माहेरी आपल्या लेकीचा लाड कोण करणार? या भावनेतून आरोपी महिलेने स्वत:च्या वहिनीच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून दिल्याचे चौकशीतून समोर आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मोनिका गणेश पवार असे मृत महिलेचे नाव आहे. त्यांना आधीच चार वर्षांचा मुलगा देखील आहे. पण, मोनिका यांनी दुसऱ्या वेळी मुलीला जन्म दिल्याने, आता माहेरी आपल्या लेकीचा लाड कोण करणार या भावनेतून नणंदे कांता संजय राठोड आपल्या वहिनीला धुसफूस करायला सुरुवात केली. तसेच त्यांच्यात सतत वाद होत असे. याच वादातून आरोपी नणंदने मोनिका यांच्या अंगावर रॉकेल ओतून त्यांना पटवून दिले आहे. यात मोनिका 80 टक्के भाजल्या असून उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी मृत महिलेच्या नातेवाईकांनी पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. या घटनेचा पुढील तपास पांढरकवडा पोलीस करत आहेत. हे देखील वाचा- Pune: पतीची हत्या करून गुन्हा लपवण्यासाठी पत्नीने लढवली अनोखी शक्कल; ऐकून तुम्हालाही बसेल धक्का

याप्रकरणी पांढरकवडा पोलिसांनी आरोपी कांता राठोड यांना ताब्यात घेतले असून त्यांच्याविरोधात कलामांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पांढरकवडा पोलीस पुढील तपास करत आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे. यासंदर्भात न्यूज 18 लोकमतने वृत्त दिले आहे.