Building Collapsed | (Photo Credit : ANI)

निर्माणाधीन असलेली एक इमारत कोसळून (Building Collapsed) शेजारील घरातील काही नागरिक गंभीर जखमी झल्याची घटना मुंबईत (Mumbai) घडली आहे. मुंबईतील अंधेरी (Andheri) पश्चिम परिसरातील जुहू गल्ली येथील अमर सोसायटीत ही घटना घडली. प्राप्त माहितीनुसार, या सोसायटीत एक 1+3 अशा चारमजली इमारतीचे बांधकाम सुरु होते. हे बांधकाम सुरु असतानाच ही इमारत शेजारील 3 घरांवर कोसळली. त्यामुळे या घरातील 5 नागरिक मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकले. या दुर्घटनेबाबत माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांची 4 तासात सुटका केली. या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही.

प्राप्त माहितीनुसार, या घटनेत जखमी झालेल्या नागरिकांना मुंबई येथील कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरु असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे. मुंबई महापालिका आणि अग्निशमन दलाचे जवान कोसळलेल्या इमारतीच्या मातीचा ढिगारा काढत आहेत. स्थानिक नागरिकांनी सांगितले की, मुंबईतील अंधेरी पश्चिम येथील जुहू गल्ली परिसरात नागरिकांनी मोठ्या स्वरुपात अनधिकृत बांधकामे केली आहेत. अनेक घरमालक वन प्लस थ्री असे मिळून 4 मजल्यांचे अनधिकृत उभारतात. या घरांमुळे धोका अधिक वाढताना दिसतो आहे. (हेही वाचा, Building Collapses in Mahad: रायगड जिल्ह्यात इमारत कोसळल्याच्या दुर्घटनेप्रकरणी NDRF च्या पथकाने शक्य तेवढी मदत करावी- अमित शहा)

एएनआय ट्विट

मुंबई असो की उर्वरीत महाराष्ट्र. राज्यातील प्रत्येक शहरात अनधिकृत बांधकांमांचा मुद्दा नेहमीच चर्चेत असतो. जेव्हा एखादी दुर्घटना घडते तेव्हा हा मुद्दा अधिक तीव्रतेने चर्चीला जातो. त्यानंतरत दुर्घटनेला काहीदिवस उलठून जाताच पुन्हा हा विषय मागे पडतो. अनधिकृत बांधकांमांना मोठा वेग येतो. नागरिकर आणि शहर व्यवस्थापन हा आपल्याकडे म्हणावा तितका गांभीर्याने न घेतला गेलेला विषय आहे. त्यामुळे शहरं भयावह पद्धतीने वाढतात. त्यातून नागरिकांच्या निवाऱ्याची सोय होत असली तरी पायाभूत सुविधा आणि व्यवस्थापनाचा मोठाच गुंता निर्माण होतो. ज्यामुळे अशा दुर्घटना घडतात.