पुणे सोलापूर हायवे भीषण अपघात: 9 ठार; रायगड दर्शनास गेलेल्या महाविद्यालयीन तरुणांचा मृत्यू
Pune Solapur Highway Accident | (Photo Credits: ANI)

Pune Solapur Highway Accident:  पुणे सोलापूर हायवेवर असेलेल्या लोणी काळभोर (Loni Kalbhor) जवळ शनिवारी (20 जुलै 2019) रात्री भीषण अपघात झाला. या अपघातात 9 जण जागीच ठार झाले. मृतांमधील 9 जण हे महाविद्यालयीन युवक आहेत. हे सर्वजण रायगड (Raigad) पाहण्यासाठी गेले होते. रायगड पाहून परतत असताना मध्यरात्री एकच्या सुमारास ही घटना कदम वाकवस्ती येथे घडली. प्राप्त माहितीनुसार अपघाताती सर्व तरुण हे पुणे (Pune) जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील यवत येथील आहेत. इर्टिका कार आणि ट्रकमध्ये धडक झाल्याने हा अपघात झाला.

अपघातात ठार झालेल्या युवकांची नावे

अक्षय भारत वाईकर, विशाल सुभाष यादव, निखिल चंद्रकांत वाबळे, सोनू ऊर्फ नूर महमद अब्बास दाया, परवेज आशपाक अत्तार, शुभम रामदास भिसे, अक्षय चंद्रकांत घिगे, दत्ता गणेश यादव आणि जुबेर अजिज अशी या अपघातात ठार झालेल्या तरुणांची नावे आहे. दरम्यान, हे युवक कोणत्या महाविद्यालयात शिक्षण घेत होते याबाबत माहिती मिळू शकली नाही. लोणी काळभोर पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून, अधिक तपास सुरु केला आहे. (हेही वाचा, पुणे-मुंबई एक्सप्रेसवर भीषण अपघात, 4 जणांचा मृत्यू)

एएनआय ट्विट

प्राप्त माहिती अशी की, वेगात असलेल्या इर्टिका कार चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे गाडीने रस्तादुभाजकाला धडक देऊन विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकला धडकली. अतिशय भीषण झालेल्या या धडकेत गाडीचा चेंदामेंदा झाला. यात गाडीत असलेलेल्या 9 युवकांचा जागीच मृत्यू झाला.