Rajan Vichare And Shrikant Shinde Bags Victory For Shivsena (Photo Credits: File Photo)

ठाणे (Thane)  व कल्याण (Kalyan) मतदारसंघातील शिवसेनेच्या हातचा विजय राखून ठेवत कल्याणमध्ये डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे (Shrikant Eknath Shinde) आणि ठाण्यात राजन विचारे (Rajan Vichare) यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. कल्याण मतदारसंघात यापूर्वी म्हणजे 2014 च्या निवडणुकीत देखील विजयी ठरलेल्या श्रीकांत शिंदे यांनी तब्बल 2 लाख 40 हजार 611 मतं मिळवत आपले विद्यमान खासदार पद जपून ठेवले आहे कल्याण मतदारसंघातून यंदा विद्यमान खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे (Shrikant Eknath Shinde) विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बाबाजी बाळाराम पाटील (Babaji Patil) यांच्यात मतांसाठी मुख्य लढत रंगली होती.पण तरुण तडफदार नेतृत्व अशी ओळख असणारे श्रीकांत शिंदे यांच्या लोकप्रियतेमुळे बाबाजी पाटील यांना पराभव पत्करावा लागला आहे.

महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल

एकीकडे कल्याण मधून जिंकल्याची बातमी हाती येत असताना ठाण्यात देखील राजन विचारे यांच्या विजयानी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंद द्विगुणित झालेला दिसून येतोय. ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार आनंद परांजपे (Anand Paranjpe)आणि शिवसेनेचे उमेदवार राजन विचारे (Rajan Vichare) यांच्यात लोकसभा निवडणूक 2019 (Lok Sabha Elections 2019) साठी जोरदार संघर्ष पाहायला मिळाली होती. निकालाच्या दिवशी मतमोजणी दरम्यान देखील यांच्यातील संघर्ष अटीतटीचा होता मात्र एन वेळी तब्बल 2  लाख 48 हजार 74 मतांची मिळकत घेऊन राजन विचारे यांनी खासदार पदावर आपले नाव कोरले आहे.

जाणून घ्या महाराष्ट्रासह संपूर्ण भारताचा निकाल एका क्लिकवर, पाहा लाइव अपडेट्स

महाराष्ट्रात पार पडलेल्या चार टप्प्यातील मतदान शेवटच्या दिवशी म्हणजेच 29 एप्रिलला ठाणे व कल्याण मतदारसंघात मतदान पार पडले होते. शिवसेनेच्या या दोन्ही उमेदवारांनी आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.