
ठाणे (Thane) जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते तथा शिक्षण महर्षी महादेव बाबुराव चौघुले (Mahadev Baburao Chaughule) यांचे शनिवारी सकाळी 7 वाजेच्या सुमारास हृदयविकाराच्या झटक्याने निधन (Passed Away) झाले. त्यांच्यावर मुंबईच्या हिंदुजा रुग्णालयात उपचार सुरू होते. महादेव चौघुले हे शरद पवारांच्या विश्वासू सहकाऱ्यांपैकी एक होते.
दरम्यान, महादेव चौघुले यांना शुक्रवारी संध्याकाळी चक्कर आली होती. त्यामुळे ते भिंतीवर कोसळले. परिणामी त्याच्या डोक्याच्या पाठीमागील भागास जोरदार मार लागून दुखापत झाली होती. त्यामुळे त्यांना मुंबईच्या हिंदुजा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. परंतु, आज सकाळी त्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने दुर्दैवी मृत्यू झाला. (हेही वाचा - कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर इयत्ता 1 ली ते 12 वी चा अभ्यासक्रम 25 टक्के कमी करण्यास राज्य सरकारची मंजुरी)
महादेव चौघुले यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले व तीन विवाहित मुली असा परिवार आहे. चौघुले यांचा राजकारणात चांगला हातखंडा होता. त्यांनी काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाखाली आपल्या राजकीय प्रवासाला सुरूवात केली होती. त्यानंतर काही दिवसांनंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. महादेव चौघुले हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्या जवळच्या नेत्यांपैकी एक होते.