Siddhivinayak Temple (Photo Credits : commons.wikimedia)

Maghi Ganesh Jayanti 2020: आजपासून सर्वत्र माघी गणेशोत्सवाला सुरुवात होत असल्याने सगळीकडेच या सणाचा उत्साह पाहायला मिळत आहे. गणेश जयंतीच्या सणाला योगायोगाने मंगळवार आल्याने भाविकांमध्ये देखील विशेष आनंद पाहायला मिळत आहे. आणि म्हणूनच आजच्या या खास दिवशी मुंबई व जवळपासचे सर्वच भाविक आज भल्या पहाटे पासूनच बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक मंदिराच्या (Siddhivinayak Temple, Prabhadevi) बाहेर रंग लावून उभे आहेत.

विशेष म्हणजे आजच्या या खास दिवशी सिद्धिविनायक मंदिराला खास सजावट करण्यात आली आहे. त्याचसोबत संपूर्ण परिसरात सुरेख रोषणाई देखील पाहायला मिळत आहे. तसेच आज भाविकांची जास्त गर्दी होण्याची शक्यता असल्याने, मंदिर प्रतिष्ठानातर्फे कोणाचीही गैरसोय होऊ नये म्हणून काही गोष्टींची काळजी घेण्यात येणार आहे.

दरम्यान, माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील विनायकी चतुर्थी ला ‘श्री गणेशजयंती’ म्हणून ओळखले जाते. याच सणाला आपण माघी गणेशोत्सव म्हणून साजरा करतो. त्यानिमित्ताने मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात दर्शन घेण्यासाठी विविध ठिकाणांहून दरवर्षी लाखोंनी भाविक जमा होतात.

Maghi Ganesh Jayanti 2020: गणेश जयंती निमित्त पुण्याच्या दगडूशेठ गणपती मंंदिरातील गणेश जन्म सोहळा इथे पहा लाईव्ह

सप्टेंबर महिन्यात येणाऱ्या गणेश जयंतीच्या वेळी बाप्पाला उकडीचे मोदक नैवेद्य म्हणून दाखवण्याची प्रथा आहे. परंतु, माघी गणेशोत्सवात मातर बाप्पाला तीळाच्या लाडवांचा नैवैद्य दाखवण्यात येतो. आणि म्हणूनच माघी गणेश जयंती या सणाला तीलकुंद चतुर्थी या नावानेही ओळखले जाते.

त्याचसोबत पुण्यातील प्रसिद्ध असणाऱ्या दगडेष्ठ हलवाई या गणेश मंदिराबाहेर देखील सकाळपासूनच भाविकांची दर्शनासाठी गर्दी जमली आहे.