Sumitra Bhandari | Twitter

भाजपा नेते माधव भंडारी (Madhav Bhandari) यांच्या पत्नीचं काल (3 जानेवारी) पुण्यामध्ये अल्पशा आजाराने निधन झाले आहे. माधव भंडारी यांच्या पत्नी सुमित्रा  वेलणकर भंडारी (Sumitra Bhandari)   या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या होत्या. त्यांनी काल वयाच्या 60व्या वर्षी शेवटचा श्वास घेतला आहे. आज पुण्यातील नवी पेठ परिसरामध्ये त्यांच्या निवासस्थानी पार्थिव अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आलं आहे. आज संध्याकाळी 4 च्या सुमारास त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.

सुमित्रा भंडारी या परभणीचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक नानासाहेब वेलणकर यांच्या त्या कन्या होत्या. विद्यार्थी असल्यापासून त्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून काम करत होत्या. लग्नानंतर त्यांनी पुणे, कोकण भागामध्ये आपलं काम नेले. तेथील सामाजिक संघटना, संस्था यांच्यासोबत त्या काम करत होत्या. नक्की वाचा: BJP MLA Laxman Jagtap Passes Away: भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांचे प्रदीर्घ आजाराने निधन .

पहा ट्वीट्स

अनेक भाजप नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी सुमित्रा भंडारी यांच्या निधनावर शोक व्यक्त करत आपला शोक संदेश ट्वीट केला आहे.