Laxman Jagtap (Photo Credit - Facebook)

भाजप आमदार आमदार लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) यांचे निधन झाले आहे. ते 59 वर्षांचे होते. जगताप यांच्या निधनािमुळे पिंपरी-चिंचवड शहरावर शोककळा पसरली आहे. लक्ष्मण जगताप हे पाठिमागील प्रदीर्घ काळापासून प्रकृतीअस्वस्थामुळे त्रस्त होते. त्यांच्यावर पुणे येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचार सुरु असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने पिंपरी चिंचवड शहरातील एक महत्त्वाचे राजकीय व्यक्तीमत्व हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. जगताप हे पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) शहर भाजपचे (BJP) माजी अध्यक्ष होते.

आमदार लक्ष्मण जगताप यांच्यावर उपचार करण्यासाठी मधल्या काळात अमेरेकहून एक इंजेक्शन मागविण्यात आले होते. त्यानंतर जगताप यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली होती. मात्र, तीच सुधारणा कायम राहू शकली नाही. त्यांची प्रकृती पुन्हा बिघडली. (हेही वाचा, Keshavrao Dhondge Passes Away: ज्येष्ठ शेकाप नेते केशवराव धोंडगे यांचे निधन 102 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास)

आमदार लक्ष्मण जगताप हे रुग्णालयात उपचार घेत असतानाही विधानपरिषद निवडणुकीसाठी विधिमंडळात आले होते. विधनपरिषद निवडणुकीसाठी रुग्णवाहीकेतून पुणे ते मुंबई असा त्यांनी प्रवास केला होता. भाजप आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांचे प्रकृीती ठिक नसतानाही मतदानाला हजर राहणे त्या वेळी राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरले होते.

आमदार लक्ष्मण जगताप हे पिंपरी चिंचवड येथील पिंपळे गुरव येथील रहिवासी रहोते. त्यांनी काँग्रेस पक्षातून आपल्या राजकीय जीवनास सुरुवात केली. 1992 मध्ये ते नगरसेवक म्हणून निवडून आले. 1997 मध्येही त्यांनी नगरसेवक पदाची निवडणूक जिंकली. पुढे ते अनेक वर्षे पिंपरी चिंचवड पालिकेत सक्रीय राहीले. महापालिका स्थायी समिती सभापती म्हणूनही त्यांनी काम पाहिले. त्यांनी पिंपरी-चिंचवडचे महापौरपद भुषविले.

ट्विट

लक्ष्मण जगताप हे शरद पवार आणि अजित पवार यांचे कट्टर समर्थक आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निष्टावान नेते होते. मात्र, पुढे त्यांच्या महत्वाकांक्षा पल्लवीत झाल्या. त्यांनी विधानपरिष लढविण्याचे ठरवले. मात्र, राष्ट्रवादीने त्यांना तिकीट नाकारले. तरीही त्यांनी विधान परिषदेची निवडणूक अपक्ष लढवून विजय मिळवला. दरम्यान, लोकसभा निवडणूक 2014 मध्येही त्यांना लोकसभेचे तिकीट राष्ट्रवादीने नाकारले. त्यामुळे त्यांनी शेकापकडून निवडणूक लढवली. मात्र, त्यात त्यांचा पराभव झाला. पुढे त्यांनी राष्ट्रवादी सोडून भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. ते विधानसभेवर निवडून आले. आज त्यांचे निधन झाले.