Indian Navy।Photo Used for Representational Purpose | Photo Credits: Wikicommmons

महाराष्ट्रातील माढा(Madha) तालुक्यातील भोगेवाडीसारख्या लहानशा गावातील विद्यार्थीनीची देशातील नौदल परीक्षेमध्ये(Navy Exam) चमकदार कामगिरी अध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरला आहे. भोगेवाडीमध्ये राहणारी पल्लवी काळे (Pallavi Kale) हीची भारताच्या नौदल कोस्ट गार्ड असिस्टंट कमांडंट पदासाठी (Indian Coast Guard Assistant Commandant) निवड झाली आहे. पल्लवीचे वडील शेतकरी असल्याने तिचं आण तिच्या कुटुंबाचं सध्या सर्वत्र कौतुक होत आहे. सध्या भारताच्या सैन्यदलामध्ये भोगेवाडी (Bhoge wadi) गावातील अनेक तरूण कार्यरत आहेत.

पल्लवी काळे ही भोगेवाडीतील नौदलातील जाणारी पहिली महिला अधिकारी बनली आहे. केंद्र सरकारच्या स्टाफ सिलेक्शनकडून घेण्यात परीक्षेत पल्लवीने दुसरा क्रमांक मिळवला आहे. आता ती नौदलामध्ये कोस्ट गार्ड असिस्टंट कमांडंट म्हणून काम करणार आहे. 12 वी उत्तीर्ण तरुणांसाठी आनंदाची बातमी; नौदलात मिळणार नोकरीची संधी.

पल्लवी काळेचं शालेय शीक्षण भोगेवाडीच्या जिल्हा प्राथमिक शाळेमध्ये झालं आहे. तर 5-12 चं शिक्षण राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा इथे झालं आहे. पल्लवीचने मेकॅनिकल इंजिनियरिंगची पदवी पुण्यामधील सिंहगड इंस्टिट्युड इथे झालं आहे. पुण्यातच पल्लवी स्पर्धा परीक्षेसाठी अभ्यास करत होती.