Amruta Fadnavis, Priyanka Chaturvedi | (Archived, Edited And Representative images)

Amruta Fadnavis Vs Priyanka Chaturvedi: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी एका डिझायनर विरोधात दाखल केलेल्या तक्रारीनंतर राज्याच्या राजकारणात उलटसुलट चर्चा सुरु झाल्या. दरम्यान, अमृता फडणवीस आणि शिवसेना (उद्धव ठाकरे गट) खासदार प्रियंका चतुर्वेदी (Priyanka Chaturvedi) यांच्यात याच प्रकरणावरुन ट्विटरवर भलताच वाद रंगला आहे. दोघींनी एकमेकिंची खिल्ली (Madam Chatur vs Fad-noise) उडवली आहे. ज्यामुळे सोसल मीडियावर (Social Media) चर्चा सुरु झाली आहे.

अमृता फडणवीस यांनी मुंबई येथील मलबार हील पोलीस ठाण्यात 20 मार्च रोजी दाखल केलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी एका डिझायनर महिलेविरोधात प्राथमीक माहिती अहवाल म्हणजेच एफआयआर (FIR) दाखल केला आहे. 'अनिक्षा' असे या महिलेचे नाव आहे. दरम्यान, एफआयआरमध्ये तिच्या वडिलांचेही नाव आहे. फडणवीस यांनी आरोप केला आहे की, आरोपी महिलेने तिच्या वडीलांवरील फौदजारी तक्रार मागे घेण्यासाठी 1 कोटी रुपयांची लाच दिली. तसेच, कट रचून धमकीही दिली. अनिक्षा ही वॉन्टेड बुकी अनिल जयसिंघानी (Anil Jaisinghani) यांची मुलगी आहे. (हेही वाचा, Devendra Fadnavis Statement: माझ्या कुटुंबाला खोट्या प्रकरणात अडकवण्याचा राजकीय डाव, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे वक्तव्य)

दरम्यान, शिवसेना (ठाकरे गट) खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी एका गुन्हेगार महिलेला उपमुख्यमंत्र्यांच्या घरात प्रवेश मिळाल्याबद्दल ट्विटर पोस्टच्या माध्यमातून आश्चर्य व्यक्त केले. तसेच, या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी अशी मागणीही केली.

'मॅडम चतुर' म्हणत खिल्ली

दुसऱ्या बाजूला अमृता फडणवीस यांनी प्रियंका चतुर्वेदी यांना प्रत्युत्तर देताना ट्विटरवर म्हटले की, 'मॅडम चतुर (हुशार), आधी तुम्ही खोटा दावा केला होता की मी अ‍ॅक्सिस बँकेचे फायदे मिळवून दिले आणि आता तुम्ही माझ्या प्रामाणिकपणाला आव्हान देत आहात? अर्थातच- तुमचा विश्वास संपादन केल्यानंतर जर कोणी-पैसे देऊन खटले बंद करण्यासाठी तुमच्याशी संपर्क साधला असता-तुम्ही अशा व्यक्तीला तुमच्या मालकाकडून मदत केली असती- तिच तुमची औकात.'

ट्विट

श्रीमती 'फॅड-नॉईज' म्हणत प्रत्युत्तर

अमृता फडणवीस यांना प्रत्युत्तर देताना खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी श्लेष काढत शाब्दिक कोटी केली आणि म्हटले की, श्रीमती 'फॅड-नॉईज' माझ्या औकातीबद्दल धन्यवाद. पण माझी औकात केवळ जाहिरातींसाठी डिझानयर कपडे घेत नाही. ज्यामुळे पुढे गोंधळाची परिस्थिती निर्माण होते. पण, मला एक लक्षात येत नाही. मी चौकशीची मागणी केली असता आपणला इतका गोंधळ का ऊडाला? ज्या दिवशी सदर महिलेने आपल्याला पैसै कमावण्याच्या टीप्स दिल्या तेव्हाच तुम्ही तक्रार द्यायला हवी होती.