उदयनराजे भोसले (फोटो सौजन्य-फेसबुक)

Lok Sabha Elections 2019:  लोकसभा निवडणुकीची तारीख काही दिवसांवर आली आहे. याच पार्श्वभुमीवर विविध राजकीय पक्षाकडून शक्ती प्रदर्शन करत आहेत. तर साताऱ्याचे उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी मंगळवारी त्यांचा उमेदवारी अर्ज भरला. त्यावेळी कार्यकर्त्यांची मोठी रॅली पाहायला मिळाली. परंतु रॅलीमध्ये चोरांनी धुमाकुळ घातला असून तब्बल 38 तोळ्यांचा गंडा कार्यकर्त्यांना घातला असल्याचा प्रकार घडला आहे.

या रॅलीमध्ये कार्यकर्त्यांची फार मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. या गर्दीदरम्यान चोरट्यांनी लोकांना लुटत 38 तोळे सोने आणि 23 रुपयांची रोकड लंपास केली आहे. तसेच लोकांच्या सोन्याच्या चैनी गेल्यामुळे रॅलीत सहभागी झालेल्यांनी या प्रकारामुळे संताप व्यक्त केला आहे.(हेही वाचा-WATCH VIDEO:पर्युषण पर्व काळात जैंन मंदिराबाहेर मांस शिजवणारी शिवसेना अल्पसंख्याक समूह विरोधी; : मिलिंद देवरा)

या प्रकरणी शहुपुरी पोलीस स्थानकात तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत. तसेच रॅली दरम्यान प्रचंड गर्दीमुळे चेंगराचेंगरी सुद्धा दिसून आली. त्यामुळेच चोरट्यांनी या गर्दीचा फायदा घेत लोकांना लुबाडले असल्याचा प्रकार घडून आल्याचे सांगितले जात आहे.