Lok Sabha Elections 2019: महाराष्ट्रात चौथ्या आणि अंतिम टप्प्यासाठी सोमवार दिनांक 29 एप्रिल 2019 रोजी मतदान
EVM Image used for representational purpose | (Photo Credits: PTI)

Lok Sabha Elections 2019: लोकसभा निवडणूक 2019 च्या चौथ्या टप्प्यासाठी उद्या म्हणजेच सोमवार दिनांक 29 एप्रिल 2019 रोजी मतदान पार पडत आहे. महाराष्ट्रातही उद्या चौथ्या आणि अंतिम टप्प्यासाठी एकूण 17 लोकसभा मतदारसंघात मतदान पार पडत आहे. यात मुंबई शहरातील सहा आणि मुंबई उपनगर तसेच महाराष्ट्रातील उर्वरीत 11  मतदारसंघासाठी मतदान पार पडत आहे. यात खासदार पुनम महाजन ( Punam Mahajan), गोपाळ शेट्टी (Gopal Shetty), अरविंद सावंत (Arvind Sawant), राजन विचारे (Rajan Vichare), श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांच्यासोबतच पार्थ पवार (Parth Pawar), उर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar), प्रिया दत्त (Priya Dutt), मिलिंद देवरा (Milind Deora) यांसारख्या अनेक चर्चित चेहऱ्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

लोकसभा निवडणूक चौथा टप्प्यातील मतदारसंघ उमेदवार आणि त्यांचे पक्ष

नंदुरबार  - डॉ. हिना गावीत (भाजप) के. सी. पडवी (काँग्रेस)

धुळे -  डॉ. सुभाष भामरे (भाजप),  कुनाल पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस), दाजमल गजमल मोरे (VBH)

दिंडोरी - भारती पवार (भाजप), धनराज महाले (काँग्रेस), बापू केळू बर्डे (VBH)

नाशिक - हेमंत गोडसे (शिवसेना), समिर भुजबळ (रा. काँग्रेस), पवन पवार (VBH)

पालघर -  राजेंद्र गावित (शिवसेना), सुरेश पडवी (काँग्रेस), बाळाराम पाटील (बविआ)

भिवंडी -  कपील पाटील (भाजप), सुरेश टावरे (काँग्रेस), ए. डी. सावंत (VBH)

कल्याण -  श्रीकांत शिंदे (शिवसेना),  बाबाजी पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस)

ठाणे -  राजन विचारे (शिवसेना),  आनंद परांजपे (रा.काँग्रेस),  मल्लिकार्जून पुजारी (VBH)

मुंबई -  उत्तर गोपाळ शेट्टी (भाजप),  उर्मिला मातोंडकर (काँग्रेस)

मंबई वायव्य -  गजानन किर्तीकर (शिवसेना),  संजय निरुपम (काँग्रेस),  मोहन राठोड (VBH)

मुंबई इशान्य -  मनोज कोटक (भाजप), संजय दिना पाटील (रा. काँग्रेस), संभाजी  काशीद (VBH)

मुंबई उत्तर मध्य - पुनम महाजन (भाजप), प्रिया दत्त (काँग्रेस)

मुंबई दक्षिण- मध्य राहुल शेवाळे (शिवसेना), एकनाथ गायकवाड (काँग्रेस), संजय भोसले (VBH)

मुंबई दक्षिण  -  अरविंद सावंत (शिवसेना), मिलिंद देवरा (काँग्रेस), अनिल कुमार (VBH)

मावळ -  श्रीरंग बारणे (शिवसेना), पार्थ पवार (राष्ट्रवादी काँग्रेस), राजाराम पाटील (VBH)

शिरुर -  शिवाजीराव आढळराव पाटील (शिवसेना), अमोल कोल्हे (NCP), राहुल ओव्हाळ (VBH)

शिर्डी - सदाशिव लोखंडे (शिवसेना), भाऊसाहेब कांबळे (काँग्रेस)

(हेही वाचा, Lok Sabha Elections 2019: महाराष्ट्र लोकसभा मतदारसंघ आणि काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप उमेदवार संपूर्ण यादी)

दरम्यान, मावळ, शिरुर, ठाणे हे मुंबई बाहेरील तर, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण आदी मतदारसंघाबाबत नागरिकांमध्ये अधिक उत्सुकता आहे. कारण मावळ येथून शरद पवार यांचे नातू आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार मैदानात आहेत. त्यांना शिवसेनेचे श्रीरंग बारणे टक्कर देत आहेत. शिरुर येथून शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या विरुद्ध शिवसेनेतून राष्ट्रवादीत आलेले डॉ. अमोल कोल्हे, ठाण्यात शिवसेनेचे राजन विचारे विरुद्ध आनंद परांजपे तर, कल्याणमध्ये शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रिकांत शिंदे यांच्या विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे बाबाजी पाटील यांची लढत आहे. शिवाय पुनम महाजन विरुद्ध प्रिया दत्त, अरविंद सावंत विरुद्ध मिलिंद देवरा, तर, गोपाळ शेट्टी यांच्या विरुद्ध अभिनेत्री उर्मिला मातोंडकर अशी लढत होणार आहे. या लढतीमंध्ये असलेले चेहरे आणि त्यांचे वलय पाहता कोण मतादधिक्य घेणार याबाबत उत्सुकता आहे.