देशात लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान आज पार पडले. देशभरातील 116 जागांसाठी हे मतदान पार पडले आहे, यात महाराष्ट्रातील 14 जागांचा समावेश आहे. सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत हे मतदान चालले. यामध्ये संपूर्ण देशात 63.24%. इतक्या मतदानाची नोंद झाली आहे तर, महाराष्ट्रात 56.57% इतके मतदान झाले आहे. सर्वात कमी मतदान झालेल्या राज्यांमध्ये जम्मू आणि काश्मीरनंतर महाराष्ट्राचा नंबर लागतो. पश्चिम बंगाल येथे सर्वात जास्त मतदान झाले आहे. 

दिवस मावळतीला झुकू लागल्यामळे उन्हाच्या झळाही काहीशा कमी होऊ लागल्या आहेत. त्यामुळे मतदारांनी पुन्हा एकदा मतदानासाठी मतदान केंद्रांवर गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. तापमानाचा पारा वाढल्यामुळे मतदारांनी घराबाहेर न पडताच सावलीचा आश्रय घेतला होता. त्यामुळे भर दुपारच्या वेळी सकाळच्या तुलनेत मतदानाचा टक्काही घरल्याचे पाहायला मिळत होते. अखेर उन्ह मावळतीला झुकू लागल्यानंतर मतदारांनी पुन्हा एकदा मतदान केंद्रांसमोर रांगा लावल्या.

लोकसभा निवडणूक तिसऱ्या टप्प्यासाठी आज सकाळपासून होत असलेल्या मतदानास दुपारपर्यंत मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळाला. दुपारपर्यंत मतदानाची सरासरी टक्केवारीही चांगली होती. मात्र, दुपारनंतर उन्हाच्या झळा वाढल्याने तापमानाचा पाराही चांगलाच वाढला. त्यामुळे मतदानाचा टक्का घसरला.

जळगाव: माजी आमदार डॉ. सुरेश पाटील यांचे वयाच्या 96 व्या वर्षीही मतदान. चोपडा येथे बजावला मतदानाचा हक्क. माजी आमदार पाटील यांनी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रात आले त्या वेळी त्यांच्यासोबत  काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संदीप पाटील, त्यांच्या पत्नी डॉ स्मिताताई पाटील हेसुद्धा उपस्थित होते.

झाकीर हुसेन शाळा येथून या व्यक्तिस ताब्यात घेण्यात आले. या व्यक्तिचे नाव तसेच, तो कोणत्या राजकीय पक्षाचा कार्यकर्ता आहे का? तसेच, त्याची ओळख याबाबत माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.

दुपारी 1 वाजेपर्यंत मतदानाची सरासरी टक्केवारी

जळगाव - 33.12 टक्के

रावेर - 35.15 टक्के

जालना - 37.91 टक्के

औरंगाबाद - 35.42 टक्के

रायगड - 38.74 टक्के

पुणे - 27.17 टक्के

बारामती - 35.58 टक्के

अहमदनगर - 34.73 टक्के

माढा - 33.41 टक्के

सांगली - 34.56 टक्के

सातारा - 34. 84 टक्के

रत्नागिरी-सिंधुदुर्ग - 39.93 टक्के

कोल्हापूर - 42 टक्के

हातकणंगले- 39.68 टक्के

सांगली लोकसभा मतदारसंघ: मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सांगली येथील मतदार संपतराव पाटील यांचे स्ट्रेचरवरुन आगमन झाले. संपतराव पाटील हे निवृत्त शिक्षक आहेत. लोसभा निवडणुकीत मतदान बजावण्यासाठी स्ट्रेचरवरुन आल्याने लोकशाहीतील त्यांच्या योगदानाचे कौतुक केले जात आहे. पाटील यांनी सांगलीवाडी येथे प्रशासनाच्या मदतीने मतदानाचा हक्क बजावला. 

माढा: सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यात रिद्देवाडी गावातील नागरिकांकडून मतदानावर बहिष्कार. गावाला चांगला रस्ता नसल्याचा गावकऱ्यांच्या मनात राग. गावात आतापर्यंत आतापर्यंत एकही मतदान नाही. 

आतापर्यंत झालेल्या मतदानाची सरासरी टक्केवारी

जळगाव - 20.34 टक्के

रावेर - 21.24 टक्के

जालना - 23.28 टक्के

औरंगाबाद - 20.97 टक्के

रायगड - 23.94 टक्के

पुणे - 15.50 टक्के

बारामती - 21.33 टक्के

अहमदनगर - 20.26 टक्के

 माढा - 19.63 टक्के

 सांगली - 20.09 टक्के

 सातारा - 28.67 टक्के

रत्नागिरी-सिंधुदुर्ग - 24.96 टक्के

कोल्हापूर - 25.49 टक्के

हातकणंगले - 23.45 टक्के

कोल्हापूर: पन्हाळा सावर्डे दुमला येथे मतदान रखडल्याने मतदार संतप्त

Load More

Lok Sabha Elections 2019 Phase-3 Voting Maharashtra Live News Updates: लोकसभा निवडणूक 2019 (Lok Sabha Elections 2019) साठी एकूण 7 टप्प्यात पार पडत असलेल्या मतदानाच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी आज (23 एप्रिल 2019) सकाळी सुरुवात झाली. तिसऱ्या टप्प्यासाठी देशभरातील 116 जागांसाठी मतदान पार पडत आहे. यात महाराष्ट्रातील 14 जागांचा समावेश आहे. तर उर्वरीत 102 जागा या गुजरात, केरळ, गोवा, दादरा नगर हवेली आणि दमन तसेच, उत्तर प्रदेश, छत्तीसगड आणि बिहार, या राज्यांतील आहे. गुजरात, केरळ, गोवा, दादरा नगर हवेली आणि दमन तसेच, उत्तर प्रदेश, छत्तीसगड आणि बिहार, या राज्यांत अनुक्रमे 26, 20,02, 01, 14, 10, 07, 05 जागांवर मतदान पार पडत आहे.

महाराष्ट्रातही दिग्गजांचे भवितव्याचा मतदार करणार फैसला

देशाबरोबर महाराष्ट्रातही दिग्गज राजकीय मंडळींच्या भविष्याचा फैसला मतदार करणार आहेत. केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्यासह भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, सुप्रिया सुळे, नीलेश राणे, सुजय विखे पाटील, रक्षा खडसे, राजू शेट्टी, उदयनराजे भोसले यांचे भवितव्य EVM मध्ये बंद होणार आहे. तिसऱ्या टप्प्यासाठी जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, रायगड, पुणे, बारामती, अहमदनगर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले लोकसभा मतदारसंघात मतदान पार पडत आहे. (हेही वाचा, महाराष्ट्राचे राजकारण ढवळून टाकणारे बहुचर्चीत लोकसभा मतदारसंघ आणि लक्ष्यवेधी लढती)

दिग्गज नेत्यांचे भविष्य EVM मध्ये होणार बंद

तिसऱ्या टप्प्यासाठी होत असलेल्या मतदानामध्ये एनेक दिग्गज नेत्यांचे भविष्य EVM मध्ये बंद होणार होणार आहे. काँग्रेसचे मल्लिकार्जुन खरगे, शशी थरूर, समाजवादी पक्षाचे मुलायमसिंह यादव, भाजपचे वरुण गांधी तर, गांधीनगरमधून भाजप अध्यक्ष अमित शहा, तर वायनाड या मतदारसंघातून राहुल गांधी रिंगणात आहेत.