देशात सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. तर प्रचारसभेसाठी शेवटचा दिवस असून राजकीय पक्षांकडून शक्तिप्रदर्शन केले जात आहे. तर आज (27 एप्रिल) शिर्डी (Shirdi) येथे भाजप (BJP) पक्षाचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी प्रचारसभेसाठी उपस्थिती लावली होती.
शिर्डी लोकसभा मतदासंघातील शिवसेना पक्षाचे उमेदवार लोखंडे यांच्या प्रचारसभेसाठी नितीन गडकरी यांनी उपस्थिती लावली होती. त्यावेळी बोलताना गडकरी यांना भोवळ आली. मात्र आता गडकरी यांची प्रकृती स्थिर असल्याचे वृत्त लोकमतने दिले आहे.(अबब! नितीन गडकरी यांच्या संपत्तीमध्ये तब्बल 140 टक्क्यांनी वाढ; जाणून घ्या एकूण संपत्ती)
यापूर्वी सुद्धा राहुरी कृषी विद्यापीठात पदवीदान सोहळ्याच्या वेळी गडकरी यांना भोवळ आली होती. तर रक्तामधील साखरेचे प्रमाण कमी झाल्याने भोवळ आली असल्याचे सांगण्यात आले होते. गडकरी यांना मधूमेहाचा त्रास असल्याने डॉक्टरांनी त्यांना आराम करण्याची गरज असल्याचा सल्ला दिला होता.