Lok Sabha Elections 2019: राजकीय पक्षांकडून लोकसभा निवडणूक 2019 प्रचार सामना आता केवळ सभा, भाषणं आणि प्रचारफेऱ्या इतकाच मर्यादित राहीला नाही. तो आता सोशल मीडियातून घराघरातच नव्हे तर, व्यक्ती व्यक्तीपर्यंत पोहोचला आहे. जनतेशी संपर्क आणि एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडण्यासाठी राजकीय पक्षांकडून सोशल मीडियाचा आधार घेतला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (Ncp) पक्षानेही भाजपवर टीका करताना सोशल मीडियाचा आधार घेतला आहे. आपल्या ट्विटर (Ncp Tweets) हँडलवरुन एक व्यंगचित्र शेअर करत राष्ट्रवादी काँग्रेसने भाजप आणि नरेंद्र मोदी (Pm Modi) यांचे अंध भक्त (Modi Bhakt) कसे ओळखावेत याचे काही मुद्दे दिले आहेत. 'तोची भक्त जाणावा..' असे मथळाही या व्यंगचित्राला देण्यात आला आहे.
व्यंगचित्रात उपस्थित केलेले मुद्दे
राष्ट्रवादीचे ट्विटरवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये एका कोपऱ्यात एक व्यक्ती उभी आहे. त्या व्यक्तिच्या डोक्यावर भक्त असे लिहिले आहे. मोदी, मोदी असा नामोल्लेख असलेल्या डिझाईनचा कुर्ता या भक्ताने परिधान केला आहे. या व्यंगचित्रासोबत राष्ट्रवादीने भक्त ओळखण्याची पाच लक्षणं देण्यात आली आहेत.
१) अपमानकारक आणि आक्षेपार्ह भाषा
२) कोणत्याच मुद्द्यांचा अभ्यास नाही
३) सोशल मीडियावर फेक फॉरवर्ड्स
४) खालच्या स्तरावरची टीका
५) राष्ट्रभक्तीचा दिखाऊपणा
अशा प्रकारे राष्ट्रवादीने भाजप आणि मोदी भक्तांची काही लक्षणे सांगितली आहेत.
(हेही वाचा, Lok Sabha elections 2019: राज ठाकरे करणार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अप्रत्यक्ष प्रचार?)
राष्ट्रवादी काँग्रेस ट्विट
तोची भक्त जाणावा...
अंध 'भक्त' ओळखण्याच्या काही सोप्या पद्धती! #Bhakt @BJP4Maharashtra @BJP4India @CMOMaharashtra @PMOIndia pic.twitter.com/4gtEQTlRh9
— NCP (@NCPspeaks) March 29, 2019
2014च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने सोशल मीडियाचा सर्वाधिक वापर केला होता. दरम्यान, 2019 च्या लोकसभा निवडणुकीत जवळपास सर्वच राजकीय पक्ष सोशल मीडियावर कार्यारत आहेत. बहुतांश राजकीय पक्षांनी आपापले सोशल मीडिया सेल कार्यरत केले आहेत. त्यामुळे आपापल्या सोशल मीडिया अकाऊंट्सवरुन हे पक्ष विरोधकांवर निशाणा साधताना दिसतात.