शरद पवार, अध्यक्ष ,राष्ट्रवादी काँग्रेसचे (| (Photo Credits- Facebook )

लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections 2019) पार्श्वभुमीवर भाजप (BJP) आणि राष्ट्रवादी (NCP) पक्षात जुंपली असून एकमेकांवर आरोपप्रत्योप केले जात आहेत. तर मंगळवारी (16 एप्रिल) सोलापूरात (Solapur) झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या सभेत त्यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांना त्यांच्या परिवारावरुन टोला लगावला होता. त्यानंतर आता राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मोदी प्रतिउत्तर दिले आहे.

मोदी यांनी शरद पवार यांच्यावर टीका करत असे म्हटले होते की, राजकरणातील उत्तम खेळाडून असून त्यांना वादळापूर्वीच्या घटनेचा अंदाज अगोदरच येतो. तसेच आपल्या चुकीमुळे स्वत:ला किंवा परिवारातील इतर सदस्यांना त्याचा त्रास होणार नाही याची ते काळजी घेतात. मात्र यावरुन आता पवार यांनी मोदींना प्रतिउत्तर देत असे म्हटले आहे की, पंतप्रधानांना कसे माहिती असणार घर कसे चालवावे. तसेच मी अजून काही यावर बोलून खालची पातळी गाठणार नाही असे विधान त्यांनी केले आहे.(हेही वाचा-सोलापूर: परिवारावर संकट येईल असे काम शरद पवार कधीच करत नाही- पंतप्रधान नरेंद्र मोदी)

तसेच मोदी यांना माझ्या घराची एवढी चिंता का सतावत आहे. मला माझी बायको, मुले आणि नातवंडे असा परिवार तरी आहे. मात्र मोदी यांचे असे कोणीच नसल्याची टीका शरद पवार यांनी केली आहे.