नरेंद्र मोदी आणि शरद पवार (फोटो सौजन्य-PTI)

सोलापूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची मंगळवारी (16 एप्रिल) सोलापूर (Solapur) येथे सभा आयोजित केली होती. त्यावेळी जनतेला संबोधित करताना विरोधी पक्षांवर टीका सुद्धा केली. खासकरुन राष्ट्रवादी (NCP) पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर मोदी यांनी जोरदार टीका केली. मोदी सभेमध्ये शरद पवार यांच्यावर टीका करत असे म्हणाले की, 'जे लोक दिल्लीतील एसीच्या खोल्यांमध्ये बसून राहतात, त्यांना वास्तवाचा आधार नसतो. परंतु शरद पवार यांनी आगामी लोकसभा निवडणुक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे त्याबद्दल मला माहिती आहे' असे विधान मोदी यांनी यावेळी केले आहे.

शरद पवार हे राजकरणातील मोठे खेळाडू असून त्यांना प्रत्येक गोष्टीची माहिती असते. तसेच आपल्याकडून झालेल्या कोणत्याही चुकीचा परिणाम स्वत:ला किंवा परिवाला होणार नाही याची ते पूर्ण खबरदारी घेतात असे नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. मात्र बाकी गोष्टींसाठी ते सामना करण्यासाठी नेहमी तयार असतात.(हेही वाचा-Lok Sabha Election 2019: भाजपाच्या तिकीटावर उभे असलेल्या सुजय विखे पाटीलच्या प्रचारासाठी कॉंग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील उतरले मैदानात)

सध्या निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर राजकीय पक्ष एकमेकांवर टीका करताना दिसून येत आहेत. तर मोदी महाराष्ट्रात त्यांच्या प्रचारसभेतून आपल्या पक्षाला जास्त मत मिळण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहेत. मात्र विरोधकांकडून मोदी यांच्या गेल्या 5 वर्षातील कामांवर निशाणा साधून टीका केली जात आहे.