मुख्यमंत्री व्हायला आवडेल, आगोदर लोकसभेचं होऊ द्या मग विधानसभेचं सांगतो: अजित पवार
अजित पवार, नेते, राष्ट्रवादी काँग्रेस (Photo Credits- Facebook )

Lok Sabha Elections 2019: मुख्यमंत्री (Chief Minister) व्हायला कोणाला आवडणार नाही? नक्कीच मलाही ते आवडेल. पण, केवळ मलाच आवडूण चालणार नाही. त्यासाठी बहुमतासाठी लागणारी आवश्यक 185 जागांचा जादूई आकडा राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि आगाडीला मिळायला हवे. मुख्यमंत्री पद हे बहुमताने मिळते. पण, हा सगळा पुढचा विषय आहे. आगोदर लोकसभेचं होऊ द्या, मग विधानसभेचं सांगतो, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (NCP leader Ajit Pawar) यांनी दिली आहे.

विधानसभेसाठी आगोदर मशागत करु

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी बारामती येथे लोकसभा निवडणूक 2019 साठी बारामती येथे मतदान केले. मतदान करुन मतदान केंद्राबाहेर आल्यानंतर अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. या वेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधिने विचारलेल्या विविध प्रश्नांना अजित पवार यांनी मनमोकळी आणि आपल्या खास शैलीत उत्तरं दिली. लोकसभा निवडणुकीनंतर अल्पावधीतच विधानसभा निवडणुका लागत आहेत. त्याकडे आपण कसे पाहता असे विचारले असता, तो पुढचा विषय आहे. सध्या आमचे लक्ष्य हे लोकसभा निवडणूक आहे. आगोदर लोकसभा निवडणुकीचा निकाल येऊ द्या. त्यानंतर विधानसभेसाठी आम्ही छान मशागत करु आणि त्यानंतरच मग विधानसभेचा विचार केला जाईल, असे अजित पवार यांनी म्हटले. (हेही वाचा, बारामती लोकसभा मतदारसंघ: सुप्रिया सुळे यांची विजयी परंपरा कांचन कुल रोखणार का?)

'बहुमताचा आकडा गाठायला हवा'

आपल्याला मुख्यमंत्री व्हायला आवडेल का असे विचारले असता मुख्यमंत्री व्हायला कोणाला आवडणार नाही? नक्कीच मलाही ते आवडेल. पण, केवळ मलाच आवडूण चालणार नाही. त्यासाठी बहुमतासाठी लागणारी आवश्यक 185 जागांचा जादूई आकडा राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि आगाडीला मिळायला हवे. मुख्यमंत्री पद हे बहुमताने मिळते. पण, हा सगळा पुढचा विषय आहे. आगोदर लोकसभेचं होऊ द्या, मग विधानसभेचं सांगतो, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी दिली.

राज ठाकरे यांच्या सभांचा फायदा होईल

राज ठाकरे यांच्या सभांचा फायदा होईल का असे विचारले असता, राज ठाकरे यांच्या सभांचा निश्चितच फायदा होईल. राज ठाकरे यांच्या सभेला लोक उत्स्फुर्थपणे गर्दी करत आहेत. 2014 मध्ये मोदींच्या सभेला होत असलेली गर्दी आता होत नाही. त्यांच्याही सभेला लोक उत्स्फुर्थ गर्दी करत असत. आता ती लाठ राहिली नाही. लोक मोदींच्या सभेतून उठून जात आहेत. राज ठाकरे हे व्हिडिओ क्लिप्स दाखवून जागृती करत आहेत. त्यामुळे लोकांवर मोठा परिणाम होईल, असेही अजित पवार या वेळी म्हणाले.