मुंबई: शरद पवार यांच्या भेटीसाठी सचिन तेंडुलकर निवास्थानी पोहचला
शरद पवार- सचिन तेंडुलकर (फोटो सौजन्य-फेसबुक)

राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या भेटीसाठी शनिवारी (30 मार्च) सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) पोहचला असल्याचे वृत्त समोर येत आहे. परंतु नेमक्या कोणत्या कारणासाठी सचिन शरद पवार यांच्या निवासस्थानी गेला होता याबद्दल स्पष्ट करण्यात आलेले नाही.

लोकसभा निवडणुक जवळ येत आहेत. तर कलाकारांनी राजकीय पक्षात पाऊल ठेवले असून विविध पक्षातून त्यांना लोकसभेसाठी उमेदवारी देण्यात आली आहे. याच पार्श्वभुमीवर आज सचिन शरद पवार यांना भेटण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी पोहचला. या दोघांमध्ये 30 मिनिटांची बैठक झाली. परंतु बैठकीत कोणत्या मुद्द्यावर चर्चा झाली हे अद्याप कळू शकलेले नाही. तर सचिन हा आगामी लोकसभा निवडणुक लढवणार का याबद्दल चर्चा सुरु झाली आहे.(हेही वाचा-Lok Sabha Elections 2019: उत्तर मुंबई मतदारसंघात गोपाळ शेट्टींनी फोडला प्रचाराचा नारळ; 'उर्मिला मातोंडकर'ही मैदानात)

तर काही दिवसांपूर्वीच शरद पवार यांनी सचिन बद्दल वक्तव्य करत असे म्हटले होते की,अवघ्या 15 वर्षात सचिनने पाकिस्तानच्या संघाला हरवले होते. तसेच सचिनने यंदाच्या विश्वकप क्रिकेट सामन्यात पाकिस्तानला हरवून आपला रेकॉर्ड कायम ठेवावा असे म्हटले होते.