Lok Sabha Elections 2019: उत्तर मुंबई मतदारसंघात गोपाळ शेट्टींनी फोडला प्रचाराचा नारळ; 'उर्मिला मातोंडकर'ही मैदानात
Gopal Shetty Vs Urmila Matondkar (Photo Credits: Twitter)

Mumbai North Central Lok Sabha Constituency: मुंबई लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूका आता अवघ्या एका महिन्यावर येऊन ठेपल्या आहेत. आज सकाळी कॉंग्रेसकडून उर्मिला मातोंडकर उत्तर मुंबई मतदारसंघातून (Mumbai North Central Lok Sabha Constituency) लोकसभा निवडणूकीचे तिकीट जाहीर झाले आहे. उर्मिला समोर भाजपाच्या गोपाळ शेट्टीचं आव्हान आहे. आज उर्मिला आणि गोपाळ शेट्टी दोन्ही उमेदवारांनी प्रचाराला सुरूवात केली आहे. Lok Sabha Elections 2019: उर्मिला मातोंडकर हिला काँग्रेसकडून तिकीट जाहीर; उत्तर मुंबई मतदारसंघातून लढवणार निवडणूक

गोपाळ शेट्टी

उर्मिला मातोंडकर

मुंबईमध्ये लोकसभा निवडणुकीसाठी मतदान 29 एप्रिल दिवशी आहे. तर लोकसभा निवडणूकीची मतमोजणी देशभरात 23 मे 2019 दिवशी होणार आहे.