Lok Sabha Elections 2019: जळगाव येथून स्मिता वाघ यांना डच्चू, उन्मेष पाटील यांना भाजप पक्षाकडून उमेदवारी
स्मिता वाघ आणि उन्मेष पाटील (फोटो सौजन्य-फेसबुक)

Lok Sabha Elections 2019: लोकसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांकडून उमेदवारी यादी जाहीर करण्यात आली आहे. तत्पूर्वी जळगाव (Jalgaon) येथून स्मिता वाघ (Smita Wagh) यांची उमेदवारी रद्द करण्यात आली असून आता उन्मेष पाटील (Unmesh Patil) यांना भाजप (BJP) पक्षाकडून उमेदवारी देण्यात आली आहे.

चाळीसगाव मधील विद्यमान खासगार उन्मेष पाटील यांना भाजप पक्षाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर गुरुवारी एबी फॉर्म भरल्यानंतर भाजप पक्षाकडून अर्ज दाखल केला आहे. तर गटबाजी आणि पराभवाच्या भीतीपोटी स्मिता पाटील यांना डच्चू देण्यात आले असल्याचे सांगितले जात आहे. तसेच सध्याचे खासदार ए.टी. पाटील यांना भाजपने उमेदवारी नाकारल्यामुळे नाराजी व्यक्त करत आहेत. त्याचसोबत गुलाबराव पाटील यांना उमेदवारी देण्यात आल्यामुळे त्यांचे पारडे जड झाले असल्याचे म्हटले जात आहे.(हेही वाचा-Lok Sabha Elections 2019: महाराष्ट्रात विद्यमान 11 खासदारांना प्रमुख पक्षांकडून डच्चू; पक्षाने नाकारली उमेदवारी, पाहा यादी)

तर सकाळी प्रचाराच्या वेळी लोकांची प्रचंड गर्दी दिसून आली. त्यावेळी स्मिता वाघ सुद्धा दिसून आल्या. तसेच पक्षाने उमेदवारी अर्ज भरण्यासाठी तयार राहण्यास यापूर्वी सांगितले असल्याते उन्मेष पाटील यांनी म्हटले आहे.