उदयनराजे भोसले (Photo Credot : Youtube)

गेली इतकी वर्षे सातारा लोकसभा मतदारसंघावर अबाधित सत्ता गाजवणारे उदयन राजे भोसले (Udayan Raje Bhosale)  यावेळीही 5,7, 6078 मतांनी निवडून आले आहेत. साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे उदयनराजे भोसले विरुद्ध शिवसेना उमेदवार आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ अध्यक्ष नरेंद्र पाटील (Narendra Patil) यांच्यात प्रमुख लढत पाहायला मिळाली. हाती आलेले निकाल पाहता साताऱ्यात उदयन राजेंचीच हवा असलेली दिसत आहे. 1999 पासून हा गड राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे राहिला आहे, आणि आताही तो राष्ट्रवादीकडेच अबाधित राहणार आहे.

उदयन राजे हे शिवाजी महाराज यांचे वंशज असल्याने साताऱ्यात कोणत्याही बाबतीत त्यांचा पराभव हा शक्यच नव्हता. मागील निवडणुकीत सातारा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांना, 5 लाख 22 हजार 531 मते मिळाली होती. तर अपक्ष उमेदवार पुरुषोत्तम जाधव यांना 1 लाख 55 हजारे मते मिळाली होती. (हेही वाचा: पार्थ पवार यांच्या पराभवाची कारणे; राष्ट्रवादी काँग्रेसलाही धक्का)

दरम्यान एक्झिट पोलचे निकाल आल्यानंतरही उदयन राजे आपल्या विजयावर प्रचंड ठाम होते. ‘एक्झिट पोल गेले खड्ड्यात. मला त्याच्याशी घेणे-देणे नाही. कोण निवडून येईल, हे उद्या कळेलच. अख्ख्या जिल्ह्याला निकाल माहित आहे गुलाल आमचाच आहे. फक्त मताधिक्य काय असणार हे जनता ठरवणार आहे.’ अशा भाषेत त्यांनी प्रतिक्रिया दिली होती.