Lok Sabha Election 2019: लोकसभा निवडणुकीसाठी मनोबल कायम ठेवण्यासाठी लोकसभेतील एक जागा द्या, रामदास आठवले यांची मागणी
रामदास आठवले (फोटो सौजन्य-फेसबुक)

Lok Sabha Election 2019:  वंचित बहुजन आघाडीचे यंदाच्या लोकसभेत आपल्यासाठी आव्हान नसून प्रकाश आंबेडकर माझे चांगले मित्र असल्याचे केंद्रीय मंत्री आणि आरपीआयचे (Republican Party of India) प्रमुख रामदास आठवले (Ramdas Athavale) यांनी म्हटले आहे. तसेच आघाडीमुळे शिवसेना (Shiv Sena)-भाजप (BJP) पक्षाला फायदा होणार असल्याचा दावा सुद्धा आठवले यांनी केला आहे.मात्र मनोबल कायम ठेवण्यासाठी लोकसभेतील एकतरी जागा देण्यात यावी अशी मागणी आठवले यांनी केली आहे.

एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत आठवले यांनी असे म्हटले की, वंचित आघाडीचे आव्हान निवडणुकीत नसणार आहे. तसेच प्रकाश आंबेडकर यांनी निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर महाराष्ट्रात एमआयएमच्या साथीने बहुजन आघाडीची स्थापना केली आहे.(हेही वाचा-Lok Sabha Elections 2019: किरीट सोमय्या यांचा भाजप उमेदवार यादीतून पत्ता कट? शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावरील व्यक्तिगत टीका भोवल्याची चर्चा)

तर भाजप-शिवसेनेने युती केली असली तरीही त्यांनी महाराष्ट्रात एक जागा तरी देण्यात यावी असे अपेक्षित होते. तसेच याबद्दल भाजप अध्यक्ष अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत यावरुन बोलणे झाले असल्याचे ही आठवले यांनी म्हटले आहे.