Lockdown in Pune: पुण्यात लॉकडाऊनची चांगल्या प्रतिसादात सुरुवात; दुसऱ्या टप्प्यात मिळणार 'या' सुविधांना मुभा
Pune Coronavirus Lockdown (Photo Credits: ANI)

कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) वाढत्या संसर्गामुळे पुण्यात कालपासून (14 जुलै) दोन टप्प्यातील लॉकडाऊनला सुरुवात झाली. या लॉकडाऊनला पुणेकरांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. आज (15 जुलै) पुण्यातील दुकानं बंद ठेवण्यात आली असून पोलिस प्रत्येक वाहनाची कसून तपासणी करत आहेत. 14 ते 19 जुलै दरम्यान लॉकडाऊनचा पहिला टप्पा पार पडणार असून 19 ते 23 जुलै दरम्यान लॉकडाऊनचा दुसरा टप्पा असणार आहे. कोविड-19 (Covid*19) च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पुणे महानगरपालिकेकडून (Pune Municipal Corporation) संपूर्ण लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे. (पुण्यात पुन्हा कडक लॉकडाऊन; जिल्ह्यात नेमके काय राहणार सुरु आणि काय बंद? घ्या जाणून)

लॉकडाऊन काळात किरणा दुकाने, भाजी विक्री, मटन, अंडी, चिकन, मासे यांची खरेदी विक्रीही बंद राहणार होती. यांसह अनेक सेवा सुविधा बंद ठेवण्यात आल्या आहेत. दरम्यान लॉकडाऊनच्या दुसऱ्या टप्प्यात म्हणजे 18 ते 23 जुलै दरम्यान मेडिकल्स, डेअरी, हॉस्पिटल्स आणि अत्यावश्यक सेवा सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.

ANI Tweet:

पुण्यात संपूर्ण लॉकडाऊनची घोषणा होताच पुणेकरांना सामान खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये एकच गर्दी केली होती. दरम्यान महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढताना पाहायला मिळत आहे. त्यात मुंबई, पुणे, ठाणे या शहरांभोवती कोविड-19 चे संकट दाट असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे ठाण्यातही लॉकडाऊन सुरु असून पुण्यातही 14 जुलै पासून कडक लॉकडाऊन पाळण्यात येत आहे. पुण्यातील कोरोना बाधितांची संख्या 39125 वर पोहचली असून 16427 रुग्ण कोरोना संसर्गातून बरे झाले आहेत. तर 1097 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.