Lockdown In Pune: पुण्यात पुन्हा कडक लॉकडाऊन; जिल्ह्यात नेमके काय राहणार सुरु आणि काय बंद? घ्या जाणून
पुण्यात (Pune) दिवसेंदिवस कोरोनाबाधित (Coronavirus) रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता पुण्यात पुन्हा एकदा कडक लॉकडाऊन (Lockdown) करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पुण्यात (Pune) दिवसेंदिवस कोरोनाबाधित (Coronavirus) रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता पुण्यात पुन्हा एकदा कडक लॉकडाऊन (Lockdown) करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, डॉक्टर, नर्स, केंद्र आणि राज्य सरकारचे कर्मचारी, प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी, दूध विक्रेते, वृत्तपत्र विक्रेते, अंगणवाडी सेविका, मेडिकल दुकानचे कर्मचारी, बी- बियाने विक्री करणारे, महावितरण, स्वच्छता कर्मचारी, पाणी पुरवठा, शहरातून जिल्हा आणि पिंपरी चिंचवडमध्ये जाणारे कामगार, जीवनावश्यक वस्तू, पार्सल, डबे पुरविणारे यांनाच परवानगी देण्यात आली आहे. मात्र, यांनाही पोलीस पास जवळ ठेवणे बंधनकारक असणार आहे. त्यामुळे प्रशासनाने जारी केलेले नियम, अटी पाळणे गरजेचे आहे.
महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना बाधित रुग्ण मुंबई पाठोपाठ पुणे शहरात आढळून आले आहेत. शहरात दररोज 1 हजार किंवा त्यापेक्षा अधिक कोरोनाबाधित रुग्णांची नोंद केली जात आहे. त्यामुळे शहरातील अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या प्रशासनाला धडकी भरवणारी आहे. याच संसर्गवाढीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पुण्यात लॉकडाऊन जाहीर केला आहे. आजपासून 23 तारखेपर्यंत पुण्यात लॉकडाऊन असणार आहे. हे देखील वाचा- पुण्यात लॉकडाऊन लागू होणार असल्याने सोशल डिस्टंन्सिंगच्या नियमाचा फज्जा उडवत नागरिकांची खरेदसाठी तुफान गर्दी
पुण्यात काय बंद राहणार?
- किरणा दुकाने, भाजी विक्री, मटन, अंडी, चिकन, मासे (14 ते 18 जुलै)
- ऑनलाईन खाद्यपदार्थ, वस्तूंची डिलिव्हरी
- मॉर्निंग वॉक, इव्हिनिंग वॉक, बाग, क्रिडांगणे आदी
- हॉटेल, रेस्टॉरंट, मॉल
- सलून, ब्यूटी पार्लर
- शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था
- दुचाकी, तीन चाकी, चार चाकी वाहतूक बंद (फक्त पासधारकांनाच परवानगी)
- बांधकामे (ज्या ठिकाणी कामगारांच्या निवासीच व्यवस्था आहे, तेथे काम सुरू ठेवता येणार)
- मंगल कार्यालये, लग्न समारंभ आदी
- सर्व खासगी कार्यालये
पुण्यात काय सुरू राहणार?
- पेट्रोल पंप व गॅस पंप सकाळी 9 ते दुपारी 2 पर्यंत खुली राहणार (फक्त पासधारकांनाच इंधन, गॅस मिळणार)
- दूध आणि वृत्तपत्रांचे घरपोच वितरण
- सर्व प्रकारच्या वैद्यकीय सेवा, ऑनलाईन औषध सेवा
- मेडिकल दुकाने, औषधांची घरपोच डिलिव्हरी
- गॅस वितरण
- बॅंका (ग्राहकांना बँकेत जाता येणार नाही), एटीएम
- माहिती तंत्रज्ञान उद्योग 15 टक्के कर्मचाऱ्यांसह सुरु राहणार
पुण्यातील कोरोनाबाधितांची संख्या 39 हजार 125 वर पोहचली आहे. यापैकी 1 हजार 646 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 16 हजार 427 जणांनी कोरोनावर मात केली आहे. ज्यामुळे यंत्रणेचे धाबे दणाणले आहेत.
(The above story first appeared on LatestLY on Jul 13, 2020 11:49 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

