Fish Dead (Photo Credits-ANI)

देशात सर्वात मोठी नदी म्हणून दुसऱ्या क्रमांकावर गोदावरी नदीचे (Godavari River) नाव घेतले जाते. मात्र सध्या उन्हाळ्याच्या काळात येथे दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली असून नदीचे पाणी बहुतांश प्रमाणात आटल्याचे चित्र आहे. तसेच नदीलगतच्या गावातील नागरिकांना पाण्यासाठी दूर दूर जावे लागते.

तर एएनआयने याबद्दल वृत्त दिले असून औरंगाबाद येथील पैठण तालुक्यात नागाव गावात भीषण दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. तर तेथील स्थानिक नागरिकांकडून असे सांगितले जात आहे की, गोदावरी नदी कोरडी झाल्याने नागरिक आणि जनावरांनासुद्धा पिण्यासाठी पाणी उरलेले नाही. याच परिस्थित सरकारसुद्धा त्यांचे मतदतीसाठी हात पुढे करत नसल्याची खंत सुद्धा व्यक्त केली जात आहे.(Palghar Earthquake Tremors: पालघर, डहाणू, तलासरी भागात पुन्हा भूकंपाचे धक्के; रात्रीपासून 3 वेळा हादरला परिसर)

त्यामुळे सध्या या गावासह अन्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी हिच परिस्थिती आहे. तसेच गावातील महिला या चक्क विहिरीत खाली उतरुन पाणी भरतानाचे फोटो यापूर्वी सोशल मीडियात खुप व्हायरल झाले होते.