फोटो सौजन्य - गुगल

दिवसेंदिवस सगळ्या गोष्टींचे भाव वाढत चालले आहे. त्यात पेट्रोल आणि डिझेलच्या दररोजच्या वाढत्या किंमतीमुळे नागरिक आधीच त्रस्त आहेत. तर आता ही परिस्थिती दारुड्यांमध्येसुद्धा दिसून येत आहेत. महाराष्ट्र राज्य सरकारने विदेशातून आयात होणाऱ्या दारुवरील उत्पादन शुल्क वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.

या सरकारच्या निर्णयामुळे विदेशी दारुची किंमत प्रती लिटरमागे वीस ते तीस रुपयांनी महागणार आहे. तर 2018-19 या वर्षातील उत्पादन शुल्काची घट भरुन काढण्यासाठी सरकारने या निर्णयाला मंजूरी दिली आहे. तसेच अंतिम मंजुरीकरिता उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बानकुळे यांनी सही करताच या निर्णयाची मान्यता होणार आहे.

महाराष्ट्राच्या अन्य राज्यात दरवर्षी दारुवरील किंमतीचे भाव वाढवले जातात. त्यामुळे येत्या वर्षात दारुचे भाव वाढण्याच्या निर्णयामुळे मंद्यपींमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.