बिबट्या । PC: Twitter Aarey

शिंदे-फडणवीस यांच्या सरकारने महाविकास आघाडी सरकारचा आरेतील कार शेडचा निर्णय बदलून मेट्रोमध्येच कार शेड उभारण्याचा निर्णय पक्का केला आहे. दरम्यान आरे (Aarey) मध्ये जैवविविधता आहे आणि ती जपण्यासाठी वन्यप्रेमी पुढे आले आहेत. कालच आरे मध्ये केलटी पाड्यात (Kelti Pada) एका घराच्या दारात बिबट्याचं (Leopard) दर्शन झालं आहे. सध्या त्याचा व्हीडिओ सोशल मीडीयामध्ये झपाट्याने शेअर होत आहे.

आरे मध्ये लेपर्ड ट्रॅपिंग मध्ये सध्या 9 पेक्षा अधिक बिबटे असल्याची माहिती समोर आली आहे. त्यापैकी 5 बिबट्यांचा वावर हा आरे कार शेड जवळ असलेल्या भागात असल्याची माहिती समोर आली आहे. हे देखील नक्की वाचा: Aarey Car Shed Dispute: आरे कारशेड वाद नेमकी काय आहे? उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस यांची भूमिका काय? वाचा सविस्तर .

केलटी पाड्यात बिबट्याचं दर्शन

लोकसत्ता मधील वृत्ताच्या माहितीनुसार, काल रात्री आरेमधी केलटी पाड्यात प्रकाश भोईर यांच्या घराजवळ बिबट्या दिसला आहे. आरे परिसरामध्ये 2019 साली बेकायदेशीरपणे करण्यात आलेल्या झाडांच्या कत्तलीविरोधातीलआंदोलनात प्रकाश भोईर यांच्या पत्नी प्रमिला भोईर सहभागी झाल्या होत्या. त्यांना यासाठी जेलवारी देखील करावी लागली होती. सोशल मीडीयामध्ये शेअर होत असलेली व्हिडिओ क्लिप ही भोईर यांच्या अंगणातील सीसीटीव्ही क्लिप आहे.