Photo Credit- X

वसई मध्ये मंगळवारी एक बाईकस्वार थोडक्यात बिबट्याच्या हल्ल्यातून बचावला आहे. ही घटना 21 जानेवारीच्या रात्रीची आहे. बाईकस्वाराचे नाव शाहरूख खान आहे. शाहरूख बाईक वरून खाली पडला आणि त्याने मदतीसाठी हाका मारल्या. आवाज ऐकून बिबट्या घाबरला. हा प्रकार वसई ईस्ट च्या Bhoidapada भागातील आहे.

गावातील लोकांना हा प्रकार समजल्यानंतर वळीव पोलिस स्टेशन मधून एक टीम घटनास्थळी दाखल झाली. जेथे बिबट्या दिसला तो रस्ता अनेकदा गावकरी वापरतात त्यामुळे त्यांच्या मनात भीती बसली असल्याचं त्यांनी कळवलं आहे. आता बिबट्याचा वावर जाणून घेण्यासाठी त्याच्या पायाचे ठसे पाहून पुढील शोध सुरू आहे.

Mid-day च्या रिपोर्ट्सनुसार, वळीव पोलिस स्टेशनच्या सिनियर इन्सपेक्टर Dilip Ghughe,यांनी दिलेल्या माहितीनुसार ठशावरून हा प्राणी बिबट्या असल्याचा अंदाज आहे. सध्या वन अधिकारी अधिक पुरावे शोधत आहेत. यामध्ये पायाचे ठसे, झाडावरील स्क्रॅचेस पाहत आहेत.

मुंबई एमएमआर मध्ये पहाण्यात आलेला हा पहिला बिबट्या नव्हे. सध्या आरे मध्ये ही बिबट्यांचा वावर आहे. खारघर हिल्स मध्येही बिबट्या आढळला आहे.

बिबट्यांच्या नसबंदीच्या प्रस्तावावर विचार सुरू

 

View this post on Instagram

 

A post shared by Satyajeet Tambe (@satyajeettambe)

मानव-बिबट्याच्या संघर्षामध्ये वाढत्या घटना आणि बिबट्याची वाढती लोकसंख्या पाहता, आमदार सत्यजीत तांबे यांनी त्यांची संख्या नियंत्रण उपाय म्हणून नसबंदीचा प्रस्ताव दिला. वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने तांबे यांनी महाराष्ट्र सरकारला लिहिलेल्या पत्रात हा मुद्दा अधोरेखित केला आहे. बिबट्यांच्या नसबंदीसाठी त्यांची परवानगी आवश्यक असल्याने हा प्रस्ताव मंजुरीसाठी केंद्र सरकारकडे पाठवण्यात येणार असल्याचे नाईक यांनी जाहीर केले आहे.

याव्यतिरिक्त, सत्यजित तांबे यांनी अशा भागातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात आणि घरांभोवती कुंपण बांधण्यासाठी अनुदान देण्याचा प्रस्ताव ठेवला, ही मागणी त्यांनी हिवाळी विधिमंडळ अधिवेशनात मांडली. या उपाययोजनांचा उद्देश ग्रामीण महाराष्ट्रातील मानव आणि बिबट्या यांच्यातील वाढता संघर्ष कमी करण्याचा आहे.