नागरी भागात घुसलेल्या बिबट्याने तीन नागरिकांवर हल्ला केल्याची धक्कादायक घटना कल्याण (Leopard Attacks Thane) येथे घडली. ठाणे जिल्ह्यातील कल्याण परिसरात असलेल्या चिंचपाडा (Chinchpada, kalyan) येथे ही घटना (Leopard Attacks Kalyan) घडली. एका इमारतीच्या खिडकीवरुन उडीमारताना लोकांनी बिबट्याला पाहिले. बिबट्याला पाहताच नागरिकांची एकच तारांबळ उडाली. लोक घाबरुन आरडाओरडा करु लागले. त्यातून बिबट्या अधिकच बिथरला. बिबट्याला पळवून लावण्यासाठी किंवा त्यावर हल्ला करण्यासाठी आरडाओरडा करत असतानाचा नागरिकांचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यात बिबट्या एका इमारतीवर पाहायला मिळतो.
बिबट्याने नागरिकांवर हल्ला केल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडीओमध्ये एक इमारतीवरुन दुसऱ्या इमारतीत प्रवेश करताना बिबट्या दिसत आहे. एका स्थानिकाच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात एनडीटीव्हीने म्हटले की, त्याला (स्थानिक) पहिल्यांदा बिबट्या दिसला. त्यानंतर त्याने त्याची माहिती लोकांना दिली. त्यानंतर लोक हातात काठ्या घेून आले. त्यातील काहींनी बिबट्यावर हल्ला केला. त्यामुळे लोकांच्या आरडाओरड्याने आगोदरच बिथरलेला बिबट्या अधिकच बिथरला. त्याने लोकांवरच हल्ला केला. (हेही वाचा, Leopard Attack In Aarey Colney: 38 वर्षीय महिलेवर आरे कॉलनी परिसरामध्ये बिबट्याचा हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत)
घटनेची माहिती वनविभागाला कळताच, वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी बिबट्याला जेरबंद करण्याचे प्रयत्न सुरु केले. दरम्यान, नाशिकमध्येही दाट लोकवस्तीच्या ठिकाणी बिबट्या दिसला होता. मात्र, वनविभागाने वेळीच घटनास्थळी धाव घेत त्याला जेरबंद केले आणि पिंजऱ्यात बंदीस्त केले.
व्हिडिओ
Video: A #leopard entered a residential building in Kalyan's Chinchpada area. The officials of forest department are at the spot to catch the leopard. pic.twitter.com/tqc2zO5m8b
— TOI Mumbai (@TOIMumbai) November 24, 2022
पाठिमागील काही दिवसांपासून बिबट्यांचे नागरिकांवरील हल्ले वाढले आहेत. सुरुवातीला हे हल्ले चंद्रपूर वैगेरे ठिकाणी होत असत. चंद्रपूर व्याघ्र परिसर म्हणूनच प्रसिद्ध असल्यामुळे तिथे वाघ आणि बिबट्यांचा निवास असणे स्वाभाविक आहे. मात्र, पाठिमागील काही काळापासून नाशिक, पुणे, कोल्हापूर, मुंबई, ठाणे आदी शहरांमध्येही बिबट्यांचा वावर वाढला आहे. मानवाने निसर्गावर अतिक्रमण करत वन्य प्राण्यांच्या अदिवासात अतिक्रमण केले आहे. त्यामुळे वन्य प्राणी नागरी वस्तीत दाखल होत असल्याचे पर्यावरणप्रेमी सांगतात. मानवाने विकासाच्या नावाखाली पर्यावरणाचा ऱ्हास सुरु केला आहे. त्यामुळे वन्य प्राण्यांना त्यांच्या निवासाचे अधिक्षेत्रच उरले नाही. परिणामी त्यांनी नागरि वस्तीकडे कूच केल्याचा दावा प्राणीमित्र आणि निसर्गाचे अभ्यास करतात.