Raigad Building Collapse: महाडमध्ये सोमवारी रात्री घडलेल्या दुर्घटनेत आतापर्यंत दोन जणांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. तर 7 जखमींवर महाड येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अजूनही 18 जण दबले असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद, राहुल गांधी, अजित पवार, अनिल देशमुख, वर्षा गायकवाड, धनंजय मुंडे यांनी सद्भावना व्यक्त केल्या आहेत.
महाड इमारत दुर्घटनेवर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. या दुर्घटनेत जखमी झालेल्यासाठी त्यांनी प्रार्थना केली आहे. तसेच ज्यांनी यात आपल्या प्रियजनांना गमवलं आहे, त्यांना सरकार मदत करील, असंही राष्ट्रपतींनी म्हटलं आहे. (हेही वाचा - Raigad Building Collapse : पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी व्यक्त केल्या महाड इमारत दुर्घटनाग्रस्तांप्रती संवेदना; शक्य ती मदत पोहचवण्याचे आश्वासन)
President Ram Nath Kovind expresses his distress over the Raigad building collapse tragedy in Maharashtra.
President Kovind tweets, "My thoughts and prayers are with the accident victims. I wish speedy recovery of the injured." pic.twitter.com/qR9JpTqGlr
— ANI (@ANI) August 25, 2020
महाडमध्ये इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेसंदर्भात पालकमंत्री आदिती तटकरे यांच्याशी संपर्क साधून माहिती घेतली. जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनाही दूरध्वनी करून बचाव आणि मदतकार्य युद्धपातळीवर करण्याचे निर्देश दिले आहेत. याठिकाणी योग्य मदतकार्य पोहचवण्यासाठी खासदार सुनिल तटकरे आणि आमदार भारत गोगावले यांच्या संपर्कात असल्याचं, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे.
महाडमध्ये इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेसंदर्भात पालकमंत्री @iAditiTatkare यांच्याशी संपर्क साधून माहिती घेतली.जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनाही दूरध्वनी करून बचाव आणि मदतकार्य युद्धपातळीवर करण्याचे निर्देश दिलेत. खासदार @SunilTatkare आणि आमदार @BharatGogawale यांच्या संपर्कात आहे.
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) August 24, 2020
महाड दुर्घटनेत दुर्दैवाने मृत्यू पावलेल्यांना गृहमंत्री अनिल देखमुख यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. आम्ही त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहोत. जखमी झालेले सर्व लवकर बरे व्हावेत यासाठी मी प्रार्थना करतो. महाराष्ट्र शासनाचे मदत व बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे, असं अनिल देशमुख यांनी सांगितलं आहे.
महाडमध्ये इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत दुर्दैवाने मृत्यू पावलेल्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. आम्ही त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहोत. जखमी झालेले सर्व लवकर बरे व्हावेत यासाठी मी प्रार्थना करतो. महाराष्ट्र शासनाचे मदत व बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) August 25, 2020
महाड येथे इमारत कोसळल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. अग्निशमन दल, एनडीआरएफ पथक व अन्य सुरक्षा यंत्रणा युद्धपातळीवर बचावकार्य मोहीम राबवत आहेत. या बचाव कार्याला लवकर यश मिळो, अशी ईश्वर चरणी प्रार्थना, अशी प्रतिक्रिया शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.
महाड येथे इमारत कोसळल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. अग्निशमन दल, एनडीआरएफ पथक व अन्य सुरक्षा यंत्रणा युद्धपातळीवर बचावकार्य मोहीम राबवत आहेत. या बचाव कार्याला लवकर यश मिळो अशी ईश्वर चरणी प्रार्थना करते. #mahadbuildingcollapse #Mahad #NDRF
— Varsha Gaikwad (@VarshaEGaikwad) August 24, 2020
महाड जि. रायगड येथील इमारत कोसळून झालेली दुर्घटना दुःखद आहे. बचावकार्य वेगाने सुरू आहे. तेथे अडकलेल्या नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात बचावकार्यास यश मिळावे ही प्रार्थना. ,, ,@iAditiTatkare ,,@SunilTatkare
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) August 24, 2020
दरम्यान, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी देखील या घटनेनंतर दु:ख व्यक्त केलं आहे. महाड जि. रायगड येथील इमारत कोसळून झालेली दुर्घटना दुःखद आहे. बचावकार्य वेगाने सुरू आहे. तेथे अडकलेल्या नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात बचावकार्यास यश मिळावे ही प्रार्थना, असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे.