Raigad Building Collapse : पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी व्यक्त केल्या महाड इमारत दुर्घटनाग्रस्तांप्रती संवेदना; शक्य ती मदत पोहचवण्याचे आश्वासन
PM Narendra Modi | Photo Credits: Twiiter/ ANI

रायगड (Raigad) मधील महाड (Mahad) मध्ये तारिक गार्डन (Tariq Garden ) इमारत कोसळल्याच्या दुर्घटनेने काल संध्याकाळी गणेशोत्सवाच्या आनंदावर विरजण पडले आहे. दरम्यान 45-50 जणांच्या कुटुंबातील रहिवाशी इमारतीच्या दुर्घटनेनंतर एनडीआरएफ पथकाकडून बचावकार्य सुरू आहे. या घटनेची दखल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी देखील घेतली आहे. ट्वीटरच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त करताना ज्या कुटुंबाने आपल्या प्रिय व्यक्ती गमावल्या आहेत त्यांच्याप्रती श्रद्धांजली तर जखमी लवकर बरे व्हावे अशी प्रार्थना. स्थानिक संस्था आणि एनडीआरएफच्या टीम्स घटनास्थळी दाखल आहे. शक्य ती सारी मदत केली जाईल. असे ट्वीट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून करण्यात आले आहे.

दरम्यान काल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देखील या दुर्घटनेची दखल घेतली आहे. जखमींना मदत करण्याचे आणि एनडीआरएफच्या टीम पाठवण्याचे ट्वीट करून सांगितले होते. आज कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी देखील महाड दुर्घटनेमध्ये जखमींना मदत करण्यासाठी स्थानिक कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी पुढे यावे असं आवाहन करत मृतांसाठी, जखमींसाठी प्रार्थना केली आहे. Mahad Building Collapse: इमारतीचे बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे, दोषींवर कारवाई करण्यात येईल - एकनाथ शिंदे.

नरेंद्र मोदी ट्वीट

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचं ट्वीट 

 

राहुल गांधी ट्वीट

महाडमधील तारीक गार्डन इमारतीच्या दुर्घटनेमध्ये 2 जणांचा आज सकाळपर्यंत मृत्यू नोंदवण्यात आला आहे. तर सुमारे 18 जण अजूनही मातीच्या ढिगार्‍याखाली दबले असल्याची भीती वर्तवण्यात आली आहे. रायडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी काल रात्रीच घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला आहे. या दुर्घटनेच्या तपासणीसाठी विशेष समिती बनवण्याचा विचार त्यांनी बोलून दाखवला आहे.