Vocalis Healthcare Initiative: कोरोनाच्या विरोधात (Coronavirus) लढण्यासाठी गोरेगावमधील (Goregaon) नेस्को जंबो सुविधा केंद्र येथे व्हॉईस बायोमार्कर्स (Voice Biomarkers) उपलब्ध करून देण्यासाठी व्होकलिस हेल्थकेअर उपक्रम (Vocalis Healthcare Initiative) प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आला. या यंत्रणेद्वारा व्यक्तिच्या किंवा संशयीत रुग्णाच्या आवाजावरुन त्याची कोरोना चाचणी करणे शक्य होणार आहे.
या उपक्रमाचा महापालिका अधिकाऱ्यांसह मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, शहर जिल्ह्याचे पालकमंत्री अस्लम शेख, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी उद्धाटन केले. (हेही वाचा - मंदिरावर असंख्य लोकांची उपजीविका अवलंबून, राज्यातील मंदिरं उघडा; शिवसेनेची सामनातून मागणी)
व्यक्ती किंवा संशयित रुग्णाच्या आवाजावरुन #COVID_19 ची चाचणी करणाऱ्या व्होकलिस हेल्थकेअर उपक्रमाचा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री @AUThackeray, शहर जिल्ह्याचे पालकमंत्री @AslamShaikh_MLA, महापौर @KishoriPednekar यांच्या उपस्थितीत गोरेगावच्या नेस्को सुविधा केंद्रात ई-शुभारंभ. pic.twitter.com/2ufI2VWgpt
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) August 23, 2020
यावेळी आदित्य ठाकरे यांनी सांगितले की, कल्पकता आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे मुंबईमधील कोरोनाविरूद्धचा लढा अधिक बळकट करण्यासाठी आणि शहरातील कोविड रूग्णांकरीता त्वरित निदान आणि रिकव्हरी वाढविण्यासाठी या उपक्रमाची मदत होणार आहे. कृत्रिम बुद्धीमत्तेवर आधारित या तंत्रज्ञानाच्या आधारे कोरोनाचे निदान लवकर करणे शक्य होणार आहे. मात्र, निदानासाठीच्या आरटी-पीसीआर चाचण्या मात्र सुरुच राहतील. आरोग्य क्षेत्रात विविध अत्याधुनिक तंत्राचा वापर केला जाईल, असेही आदित्य ठाकरे यांनी यावेळी सांगितले.