
Latur Crime: महाराष्ट्रातील लातूर (Latur) जिल्ह्यात पूर्व वैमनस्यातून दोन सख्खा चुलत भावांची हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी धाव घेतला आणि पंचनामा केला. या घटनेनंतर गावात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणात पाच आरोपी आहे त्यापैकी अद्याप तीन आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. विकास शिवाजी सुर्यवंशी (वय 23), महेश उत्तम सुर्यवंशी (वय 20) असं मयत चुलत भावांचे नाव आहे. (हेही वाचा- माजी नगर सेवक कल्लू यादव गोळीबार प्रकरणात चार आरोपी अटकेत, दोन फरार)
मिळालेल्या माहितीनुसार, लातुर जिल्ह्यातील जळकोट तालुक्यात रावणकोळा येथे ही घटना घडली. दोन सख्या चुलत भावाचा अतिशय निर्घृणपणे खून करण्याता आला आहे. दोघांच्या ही धारदार शस्त्राने पोटात वार केला आहे. दोघांची जुन्या वादातून हत्या केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात पाच आरोपी आहे. पोलिसांनी या पैकी तीन आरोपींना अटक केली आहे. मुख्य आरोपी प्रकाश मुरारी सुर्यवंशी आणि त्याच्या बरोबरच्या इतर चार हल्लेखोर घटना स्थळी उपस्थित होते.
विकास आणि महेश यांच्या पोटात धारदार शस्त्राने हल्ला केला. आरोपींने आणि या दोघां भावाचे जुने वाद होते, पुन्हा भांडण करून दोघांची हत्या केली. हल्ल्यात पोटात गंभीर जखमी झाल्याने दोघांचाही मृत्यू झाला. जळकोट पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्ह्याची माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला.दोघांचे ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. पोलिसांनी तात्काळ तीन आरोपींना अटक केली. तीन पैकी एक महिलेचा समावेश आहे.पोलिस पथख दोन पसार आरोपींचा शोध घेत आहे.