आज सकाळी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचे निधन झाल्यानंतर संध्याकाळी शिवाजी पार्क (Shivaji Park) वर त्यांच्यावर अंतिम संस्कार होणार आहेत. यासाठी सध्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क वर बीएमसी आणि राज्य सरकार यांच्याकडून तयारी सुरू आहे. लता दीदींच्या अंत्यदर्शनाला देशभरातून व्हीव्हीआयपी मंडळी मुंबई मध्ये दाखल होणार आहेत. त्यामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देखील समावेश आहे. दुपारी 4 च्या सुमारास ते मुंबईमध्ये दाखल होणार आहेत. त्यानंतर शिवाजी पार्क मध्ये ते येणार आहेत. सर्वसामान्यांना लतादींदीच्या पार्थिवाचे दर्शन घेता येणार आहे. त्यासाठी विशेष सोय करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्याचे मीडीया रिपोर्ट्समधून समोर आले आहे.
दरम्यान लता मंगेशकरांच्या पार्थिव दर्शनासाठी व्हिव्हीआयपी आणि सामान्य चाहते यांच्या येण्या-जाण्यासाठी वेगवेगळे रस्ते ठेवले जाणार आहेत. आज सकाळी लता मंगेशकर यांच्या अंतिम दर्शनाच्या कार्यक्रमासाठी पालिका प्रशासनाच्या कामाचा आढवा आणि तयारी पाहण्यासाठी स्वतः आदित्य ठाकरे शिवाजी पार्क वर आले होते. यावेळी विश्वास नांगरे पाटील, बीएमसीचे किरण दिघवेकर हे उपस्थित होते. लता मंगेशकर यांचे पार्थिव दुपारी 3-4 या वेळेत पेडर रोड येथील त्यांच्या प्रभुकुंज या निवासस्थानी ठेवले जाणार आहे तर त्यानंतर 6 वाजता शिवाजी पार्क वर आणले जाणार असून 6.30 च्या सुमारास त्यांच्यावर शिवाजी पार्क परिसरामध्येच अंतिम संस्कार केले जाणार आहेत. नक्की वाचा: Lata Mangeshkar Passes Away: स्वर कोकिळा लता मंगेशकर यांना पहिल्या कमाईत मिळाले होते 25 रुपये, 'या' कारणामुळे केलं नाही लग्न .
अंत्यसंस्काराची तयारी
Maharashtra Minister Aaditya Thackeray reviews preparations for the last rites ceremony of singer Lata Mangeshkar at Shivaji Park in Mumbai; to be held with full State honours today evening. pic.twitter.com/Hwba47DGCg
— Prasar Bharati News Services पी.बी.एन.एस. (@PBNS_India) February 6, 2022
Preparations are underway for the state funeral of singer Lata Mangeshkar at Mumbai's Shivaji Park pic.twitter.com/socyiQmhSB
— ANI (@ANI) February 6, 2022
अंत्यसंस्काराची वेळ
Maharashtra | Prime Minister Narendra Modi will reach the funeral ground at around 5:45-6:00pm today, after which #LataMangeshkar Ji's last rites will be conducted at around 6:15-6:30pm: Brihanmumbai Municipal Corporation Commissioner Iqbal Singh Chahal pic.twitter.com/HwXVj6cMCR
— ANI (@ANI) February 6, 2022
9 जानेवारीला लता मंगेशकर यांना कोविड 19 ची लागण झाली होती. त्यानंतर न्युमोनियाचे निदान झाले. ब्रीज कॅन्डी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू होते. त्यांनी दोन्ही आजारांवर काही दिवसांपूर्वी मात केली होती पण काल पुन्हा प्रकृती ढासळल्याने व्हेटिलेंटर वर ठेवण्यात आले होते. त्यामध्ये त्यांची प्रकृती चिंताजनक बनली आणि आज सकाळी 8.12 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.