महाराष्ट्रात 20 नोव्हेंबर दिवशी एकाच टप्प्यात विधानसभा निवडणूकीसाठी मतदान (Maharashtra Vidhan Sabha Election) होणार आहे. या निवडणूकीमध्ये मतदान करण्यासाठी नागरिकांचे नाव मतदार यादीमध्ये (Voters List) असणं आवश्यक आहे. त्यामुळे आता नागरिकांना ऑनलाईन माध्यमातून त्यांचं नाव मतदार यादीमध्ये आहे की नाही? हे तपासण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. तर यामध्ये काही बदल करायचं असल्यास किंवा नवी नाव नोंदणी करण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. voters.eci.gov.in या निवडणूक आयोगच्या अधिकृत वेबसाईट वर मतदारांना नाव नोंदणी, दुरूस्ती आणि अपडेटची सोय आहे.
मतदारांना नवी नाव नोंदणी करण्यासाठी फॉर्म 6 भरावा लागणार आहे. तर नावामध्ये बदल, पत्ता बदलला असेल, फोटो, मोबाईल नंबर अपडेट करायचा असेल तर फॉर्म 8 भरावा लागणार आहे. मतदार यादी मधून नाव वगळण्यासाठी फॉर्म 7 भरावा लागणार आहे. तसेच ऑनलाईन ई इपिक कार्ड डाऊनलोड करायचे असेल तर मोबाईल नंबर आणि फोटो अपडेट करणं आवश्यक आहे. voters.eci.gov.in च्या होम पेज वर हे फॉर्म उपलब्ध आहेत.
ऑनलाईन कसं तपासाल तुमचं नाव यादीमध्ये आहे का?
-
- voters.eci.gov.in ला भेट द्या.
- होम पेज वर Search in Electoral Roll वर क्लिक करा.
- आवश्यक माहिती टाका.
- तुमचं नाव, पोलिंग बुथ आणि अन्य सारे तपशील तुमच्या समोर दिसतील.
मतदाता सूची में नाम चेक करना हुआ आसान, ऐसे चेक करें अपना नाम!
डाउनलोड करें वोटर हेल्पलाइन ऐप (VHA) #VHA #MaharashtraElection #JharkhandElection #AssemblyElections pic.twitter.com/p1gynu5rwo
— Election Commission of India (@ECISVEEP) October 16, 2024
दरम्यान तुम्हांला दिसत असलेले तपशील चूकीचे असतील तर त्यामध्ये बदल करण्यासाठी देखील आजचा शेवटचा दिवस असल्याने याच संकेतस्थळावर लॉगिन करा. त्यानंतर एक ओटीपी येईल तो टाका. आता जे बदल करायचे आहेत त्यासाठी आवश्यक फॉर्म भरा.
पहा आवश्यक कागदपत्रं कोणती?
विधानसभा निवडणूकीत मतदान करण्यासाठी शेवटची संधी. मतदार यादीत आजच नाव तपासा. यादीमध्ये नाव नसलेल्या सर्व पात्र मतदारांनी दि. १९ ऑक्टोबर २०२४ पर्यंत ऑनलाईन किंवा ऑफलाईन नोंदणी करा #LastDayOfRegistration Election Commission of India MyBmc #विधानसभानिवडणूक२०२४ #MaharashtraElections pic.twitter.com/7a5QBN3pI6
— ChiefElectoralOffice (@CEO_Maharashtra) October 19, 2024
1/10/ 2024 पर्यंत वयाची 18 वर्ष पूर्ण केलेल्या सार्या महाराष्ट्रातील नागरिकांना मतदानाचा अधिकार आहे. आज 19 ऑक्टोबर 2024 च्या रात्री 12 वाजेपर्यंत ही नावनोंदणीची प्रक्रिया खुली राहणार आहे.