Landslide In Kashedi: कशेडी घाटात (Kashedi Ghat) दरड (Landslide) कोसळल्याने मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग (Mumbai-Goa National Highway) ठप्प झाला आहे. त्यामुळे रात्रभर हा महामार्ग ठप्प राहणार आहे. पोलादपूर तालुक्यात धामणदेवी गावाच्या हद्दीत ही दरड कोसळली. त्यामुळे आज रात्री महामार्गावरची वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. या घटनेची माहिती मिळताचं पोलादपूर पोलीस आणि एल अँड टीची टीम घटनास्थळी दाखल झाली.
दरम्यान, आज रात्रभर रस्त्यावरील दरड उपसण्याचे काम सुरू राहणार आहे. परिणामी आज कशेडी घाट वाहतुकीस पूर्णपणे बंद राहणार आहे. कशेडी घाटात दरड कोसळल्याने मुंबई-गोवा महामार्गाच्या दोन्ही बाजूकडील वाहतुक बंद झाली आहे. सध्या महामार्ग प्राधिकरण आणि कंत्राटदार यांच्या मदतीने दरड हटविण्याचे काम सुरु आहे. दरड उपसण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर हा महामार्ग वाहतूकीसाठी खुला करण्यात येईल. (हेही वाचा - भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सीईओ राहुल जोहरी यांचा राजीनामा बीसीसीआयने स्वीकारला; 9 जुलै 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE)
कशेडी घाटात दरड कोसळली; मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग राहणार रात्रभर ठप्प.
पोलादपूर तालुक्यात धामणदेवी गावाच्या हद्दीत कोसळली दरड.महामार्गावरील वाहतूक बंद, पोलादपूर पोलिस,एलअँडटीची टीम घटनास्थळी दाखल; रात्रभर दरड उपसण्याचे काम सुरू राहणार.कशेडी घाट वाहतुकीस पूर्णपणे बंद राहणार
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) July 9, 2020
गेल्या दोन ते तीन दिवसांपासून रत्नागिरी, मुंबई तसेच गोव्यामध्ये पाऊस सुरू आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी दरड कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. बुधवारी रात्री आणि गुरुवारी सकाळी विन्हेरे नातू मार्गावर दरड कोसळली होती. त्यामुळे महाड कडून खेडकडे जाणारा पर्यायी मार्ग बंद झाला होता.
रत्नागिरी जिल्ह्यात कशेडी गाव आहे. या गावाच्या नावावरुन ओळखला जाणारा कशेडी घाट पोलादपूरजवळ महाड ते खेड या पट्ट्यात येतो. कशेडी घाट हा जवळपास 7.2 किलोमीटरचा रस्ता आहे. प्रवासाच्या दृष्टीने अतिशय कठीण असा हा घाट आहे. मुंबई-गोवा-कोच्ची महामार्गावर हा घाट आहे.