आसाममध्ये आज 568 नव्या कोरोना रुग्णांची नोंद ; 9 जुलै 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
बातम्या
Chanda Mandavkar
|
Jul 10, 2020 12:00 AM IST
देशभरात कोरोना व्हायरसचा विळखा अधिक घट्ट होताना दिसून येत आहे. त्यामुळे दिवसागणिक कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत प्रचंड वाढ होण्यासोबत बळींचा ही आकडा वाढत आहे. देशातील कोरोनाच्या परिस्थिती बाबात बोलायचे झाल्यास आकडा 7 लाखांच्या पार गेला आहे. कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी लसी संदर्भात संशोधन करण्यात येत आहे. दुसऱ्या बाजूला आता पावसाला सुद्धा विविध ठिकाणी सुरुवात झाल्याने साथीच्या रोगाची चिंता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वत:सह परिवाराची काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.
अमेरिकेत कोरोनाबाधितांचा आकडा 3 मिलियनच्या पार गेला आहे. तसेच आतापर्यंत 131,000 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटी यांनी माहिती दिली आहे. (Coronavirus: चीनमुळेच जगातील अनेक देशांची आर्थिक घडी विस्कटली; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा आरोप)
भारतीय सैन्याने आपल्या सैनिकांना स्मार्टफोनमधून 89 अॅप्स हटविण्याच्या सूचना दिल्या आहेत. सैन्याच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, लष्करातून बाहेर पडणारी माहिती रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. या अॅप्समध्ये टिक टॉक (TikTok), ट्रू कॉलर (Truecaller) आणि इंस्टाग्राम (Instagram) इत्यादींची नावे आहेत.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी येत्या काही दिवसात राज्यात जिम सुरु करण्याची शक्यता व्यक्त केली आहे. तर एएनआय यांनी ट्वीट करत असे म्हटले आहे की, हॉटेल्स सुरु करण्यात आले आहेत. त्या्मुळे आता जिम सुद्धा पुन्हा सुरु करण्याचा विचार राज्य सरकारकडून करण्यात येत आहे. परंतु त्यावेळी सोशल डिस्टंन्सिंगच्या नियमाचे पालन करावे अशी अट लागू असणार असल्याचे ही टोपे यांनी स्पष्ट केले आहे.