landslide pc pixabay

Anuskura Landslide: पावसाळ्याला सुरुवात होताच, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या घाटात एक घटना घडली आहे. अणुस्कुरा घाटात गुरुवारी रात्री दरड कोसळली. त्यामुळे या मार्गावर येणाऱ्या कोल्हापूर येथील वाहतूक सेवा रात्रीच बंद करण्यात आली. घटनास्थळी वाहतुक सेवा विस्कळीत झालेली पाहायला मिळत आहे. दरड कोसळल्याने पसिरसात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.  (हेही वाचा- घाटकोपरमध्ये दरड कोसळली, 10-12 झोपड्या केल्या रिकाम्या, कोणतीही जिवीतहानी नाही)

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस होता. या पावसाळामुळे दरड कोसळली आहे अशी माहिती समोर येत आहे. घटनेची माहिती मिळताच, प्रशासन घटनास्थळी दाखल झाले त्यांनी जेसीबीच्या मदतीने दरड उचलून बाजूला ठेवले जात आहे. या घटने अंतर्गत आणखी काम सुरु आहे. शुक्रवारच्या पहाटेपासून दरड उचलण्याचे काम सुरु झाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. या संदर्भात कोणतेही वृत्त प्रसारित नाही.

घटनेमुळे कोल्हापूर मार्गे येणारी वाहतूक सेवा बंद करण्यात आली आहे. काम सुरु असल्यामुळे घाटात वाहतूकीचा खोळंबा झाला आहे. त्यामुळे प्रवाशी त्रस्त झाले आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण विभागाला जोडणारा महत्त्वाचा मार्ग आहे. गेल्या वर्षी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पावसामुळे दरड कोसळल्याची घटना घडली.