Latur: राज्य सरकारकडून ' मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण' या योजनेची घोषणा केल्यापासून आता पर्यंत अनेक महिलांनी या योजनाचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन फॉर्म भरले. या योजनेसाठी लाभ घेण्यासाठी गेलेल्या महिलेला पैसे मोजावे लागल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. लातूर जिल्ह्यातील शाळेत प्रयोगशाळा सहाय्यकाने एका महिलेकडून 400 रुपयाची लाच घेतली. या प्रकरणी त्याला अटक करण्यात आला आहे. (हेही वाचा- अमरावती मध्ये ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना ’मध्ये लाच मागणं भोवलं; तलाठी निलंबित
मिळालेल्या माहितीनुसार,माझी लाडकी बहिण या योजनेसाठी एका महिलेला तीच्या बहिणीच्या शाळा सोडल्याच्या प्रमाणपत्राची गरज होती.या योजने अंतर्गत महिलांना १५०० रुपयांचा मासिक भत्ता दिला जातो. शाळेत जाऊन प्रमाणपत्राची मागणी केली त्यावेळी प्रयोगशाळा सहाय्यकाने तिच्याकडून पैशांची मागणी केली. प्रमाणपत्रासाठी प्रयोगशाळा सहाय्यकाने महिलेकडे ४०० रुपयांची मागणी केली. यानंतर महिलेने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.
मंगळवारी एसीबीने सापळा रचून या प्रकरणी शाळेत छाप टाकला. त्यानंतर प्रयोगशाळा सहाय्यकाला लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. एसीबीच्या तक्रारीनुसार देवणी पोलिसांनी आरोपीविरुध्दात गुन्हा दाखल केला. या घटनेनंतर अनेकांनी शाळेच्या प्रशासनावर प्रश्न उपस्थित केला. अमरावती येथील वरूड येथे एका तलाठी अर्जदार महिलांकडून पैसे घेतल्याचा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर तलाठी तुळशीराम कंठाळे यांना कामातून निलंबित करण्यात आले होते.