अमरावती मध्ये ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना ’मध्ये लाच मागणं भोवलं; तलाठी निलंबित
CM Eknath Shinde | Twitter

महाराष्ट्र सरकारने अंतरिम बजेट मध्ये ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना’ (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojna 2024) जाहीर केली आणि 1जुलै पासून त्याच्यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली. पहिल्या दिवसापासूनच या योजनेला महिलांची गर्दी पाहून त्यामध्ये काही बदल करण्यात आले. पण या योजनेच्या नावाखाली अर्जदारांची लूट होत असल्याचेही पहायला मिळत आहे. अमरावती मध्ये वरूड इथे एक तलाठी अर्जदार महिलांकडून पैसे घेत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. या प्रकरणामध्ये तलाठी तुळशीराम कंठाळे यांना निलंबित करण्यात आले आहे.

जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी याबद्दल माहिती दिली आहे. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना' ही सीएम शिंदेंसाठी महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेखाली महिलांना फायदा मिळवून देण्याचा उद्देश असताना लाच स्वीकारणार्‍या तलाठी विरूद्ध तातडीने कारवाई करत निलंबनाचे निर्देश देण्यात आले आहेत. Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana 2024: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मध्ये CM Eknath Shinde यांनी केली महत्त्वाच्या बदलांची घोषणा .

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना' मध्ये केलेल्या बदलांमध्ये वयोमर्यादा वाढवण्यात आली आहे. सोबतच अर्ज करण्यासाठी देखील 31 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या योजनेसाठी ऑनलाईन सोबतच ऑफलाईन अर्ज करण्याची मुभा आहे. लाभार्थी महिलांना या योजनेमध्ये दरमहा 1500 रूपये मिळणार आहेत.   या योजनेतून ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार/आमदार असेल, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किवा राज्य सरकारच्या मंडळाचे सदस्य असेल ,ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन असेल, ज्यांच्याकडे चारचाकी वाहने (ट्रॅक्टर वगळून) असेल त्यांना दूर ठेवले जाणार आहे.