Summer Special Trains on Konkan Rail Line: उन्हाळी सुट्ट्या आणि त्यामध्ये आज महावीर जयंती, गुड फ्रायडेला जोडून आलेला शनिवार - रविवार यामुळे अनेकांसाठी हा लॉंग विकेंड ठरला आहे. अनेक मुंबईकरांनी लागून आलेल्या या सुट्ट्यांचा वापर करत कोकण (Konkan), गोवा (Goa) अशा लहानशी ट्रीप प्लॅन केली असेल तर कोकण रेल्वेने तुमच्यासाठी खास सोय केली आहे. 19 एप्रिल ते 12 मे या दरम्यान कोकण रेल्वे सीएसएमटी ते करमाळी या स्थानकादरम्यान विशेष ट्रेन चालवणार आहे. April 2019 Holiday List: 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती' ते 'ईस्टर' मुळे 14-21 एप्रिल दरम्यान सलग सुट्ट्यांची चंगळ
कोकण रेल्वे मार्गावर धावणार नवी उन्हाळी विशेष गाडी
Running of additional Summer Special Trains - 2019. #Summer2019 #SpecialTrains @RailMinIndia pic.twitter.com/x2Tj7gOySp
— Konkan Railway Corp (@KonkanRailway) April 17, 2019
01003 आणि 01004 सीएसएमटी करमाली विशेष ट्रेन
सीएसएमटी ते करमाली स्थानकादरम्यान नियमित एक ट्रेन धावणार आहे. दर शुक्रवारी सीएसएमटीवरून (01003 ) मुंबई सीएसएमटी करमाली ही ट्रेन रात्री 8.25 वाजता सुटेल तर करमाली स्थानकामध्ये ही ट्रेन सकाळी 8.30 वाजता पोहचेल. करमाली स्थानकामधून दर रविवारी 01004 ही करमाली ते सीएसएमटी ट्रेन दुपारी 12.50 ला सुटेल आणि रात्री 00.20 वाजता पोहचेल. परतीची विशेष ट्रेन 21 एप्रिल ते 12 मे दरम्यान चालवली जाणार आहे.
01006 आणि 01005 करमाली सीएसएमटी करमाली विशेष ट्रेन
01006 ही करमाली -मुंबई विशेष ट्रेन दर शनिवारी करमाळीहून दुपारी 12.50 ला सुटेल आणि रात्री 23.55 ला मुंबईत पोहचेल. तर 01005 ही ट्रेन दर रविवारी 00.45 वाजता सुटेल आणि 12.20 ला पोहचेल. IRCTC Summer Special Trains 2019: उन्हाळ्याच्या सुट्ट्यांसाठी भारतीय रेल्वेची खास 'समर स्पेशल ट्रेन्स'ची सुविधा; पहा यादी
सुट्ट्यांचा मौसम लक्षात घेता आणि मुंबई, पुणे पेक्षा कोकणात थंडावा अधिक असल्याने अनेकांचा गोवा किंवा कोकणातल्या समुद्र किनारी सुट्ट्यांचा आनंद घेण्याचा प्लॅन असतो. कोकणातील समुद्र किनार्यांवर आता वॉट्सस्पोर्ट्स आणि स्कुबा डायव्हिंगसारखे अनेक उपक्रम सुरू करण्यात आल्याने कोकणात जाणार्यांची संख्या वाढली आहे.